Friday, May 24, 2024

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील ‘तुम क्या मिले’ गाणे रिलीज, आलिया-रणवीरच्या केमिस्ट्रीने वेधले चाहत्यांचे लक्ष

रॉकी और राणी की प्रेम कहाणी‘ हा करण जोहरचा यावर्षीचा सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे.  काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, जाे पाहिल्यानंतर चाहत्यांना 90च्या दशकाची आठवण झाली आणि असे वाटले की, करण जोहरने त्याच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या सर्व चित्रपटांचा हा मॅशअप आहे. अशात टीझर प्रेक्षकांना खूप आवडला असला तरी आता या चित्रपटातील रणवीर आणि आलियाचे ‘तुम क्या मिले‘ हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये आलिया आणि रणवीरचा जबरदस्त रोमान्स पाहायला मिळत आहे.

या गाण्यात आलिया भट्ट(alia bhatt)शिफॉन साडी घालून रणवीर सिंगसाेबत काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये रोमान्स करताना दिसत आहे. हे गाणे तुम्हाला 90च्या दशकाची आठवण करून देईल अशा पद्धतीने शूट करण्यात आले आहे. या गाण्याचे संगीतही लोकांच्या पसंतीस उतरले आहे. बर्‍याच दिवसांनंतर अरिजित सिंग, अमिताभ भट्टाचार्य आणि प्रीतम दादा हे तिघे ‘तुम क्या मिली’ गाण्यासाठी एकत्र आले हाेते. याआधी हे तिघेही ‘ए दिल है मुश्किलमधील’ चन्ना मेरेया गाण्यासाठी एकत्र दिसले होते.

या गाण्याबाबत करण जोहर म्हणतो, ‘प्रेम गाणी नेहमीच आव्हानात्मक असतात. धर्मा प्रॉडक्शनची प्रेमगीते नेहमीच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. मला आठवतंय की, आम्ही रॉकी और राणी की प्रेम कहाणी प्रेमगीताचं रेकॉर्डिंग शेवटचं ठेवलं होतं. कारण, प्रीतम दादा, अमिताभ आणि मी हे गाणं कसं वाजवणार याबद्दल खूप घाबरलो होतो. आम्ही नेहमी आमच्या वांद्रे ऑफिसमध्ये भेटायचो कारण दादा ते त्यांच्यासाठी खूप भाग्यवान मानत. मला आठवतं की, आमच्या एका बैठकीत त्यांनी आम्हाला ‘सिर्फ तुम क्या मिले’ची धून सांगितली होती आणि ती माझ्या मनात गुंजली. ‘तुम क्या मिले’ हे खरोखरच आमच्या सर्व सामूहिक हृदयाचा एक तुकडा आहे आणि मला आशा आहे की, ते आमच्या अनेक प्रेम गाण्यांप्रमाणे प्रेक्षकांशी एक सुंदर कनेक्शन निर्माण करेल. ( Movie Rocky aur rani ki prem kahani first song tum kya mile release ranveer alia romance in snow clad mountains)

अधिक वाचा-
राहुल शर्मासोबत घटस्फोटाच्या अफवांवर असिनने साेडले मौन, ‘गजनी’ अभिनेत्रीने पोस्ट करून सांगितले सत्य
गुलाबी साडी नेसून अक्षरा सिंगने घातली नवऱ्याला भुरळ, अभिनेत्रीचे ‘कनबलिया से धक्का’ गाणे रिलीज

हे देखील वाचा