बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या चांगलीच चर्चेत असून ती तिच्या आगामी ‘गदर 2‘ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, ज्यानंतर चाहते ‘गदर 2’च्या रिलीजची वाट पाहत आहेत. अशात सनी देओल आणि अमिषा पटेल या जोडीने ‘गदर 2’च्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. अमिषा पटेल मंगळवारी (27 जुन)ला दर्ग्यात गेली हाेती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…
खरे तर, अभिनेत्री अमीषा पटेल (ameesha patel) मंगळवारी दर्ग्यात गेली हाेती. यादरम्यान अभिनेत्रीने तेथील लाेकांना जेवण वाटले. मात्र, अभिनेत्रीचे हे उदात्त काम सोशल मीडियावर युजर्सना आवडले नाही आणि ते तिला ट्राेल करू लागले. यावेळी अभिनेत्री काळ्या रंगाचा सूट परिधान करून दर्ग्यात पोहोचली होती. अशात काही लाेक अभिनेत्रीच्या वागण्याचे काैतुक करत आहेत, तर काहीजण ‘गदर 2’ सुपर फ्लॉप ठरणार असल्याचे सांगत आहेत.
अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ‘असे दिसते आहे की, ‘गदर 2 फ्लॉप होणार आहे. राम मंदिरात जा. आता तिथेच काहीतरी हाेऊ शकते, तर दुसर्या युजरने लिहिले, ‘हिट होण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जातात.’ अशात आणखी एका युजरने लिहिले, ‘सकीना पुन्हा पाकिस्तानात गेली.’
View this post on Instagram
सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट ‘गदर 2’ चे दिग्दर्शन कोअनिल शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मंडळी, ‘गदर 2’ सोबतच रणबीर-रश्मिकाचा अॅनिमल आणि अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. अशात बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. (bollywood actress ameesha patel trolled for after visit to dargah ahead of gadar 2 release)
अधिक वाचा-
–ब्लाइंड टीझर: सीरियल किलरच्या शोधात निघाली सोनम कपूर, 4 वर्षांनंतर परतणार रुपेरी पडद्यावर
–गुलाबी साडी नेसून अक्षरा सिंगने घातली नवऱ्याला भुरळ, अभिनेत्रीचे ‘कनबलिया से धक्का’ गाणे रिलीज