Friday, December 1, 2023

‘पाकिस्तानचा जावाई आहे ताे, त्याला नारळ द्या अन्यथा…’, ‘गदर 2’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट ‘गदर 2‘ सध्या चांगलाच चर्चेत आहे. 22 वर्षांपूर्वी गदरने ज्या पद्धतीने धुमाकुळ घातला होता, त्याचाच दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गदरमधील सकीना आणि तारा सिंगची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनाला भिडली असून अलीकडेटच या चित्रपटाचा पहिला भाग सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला हाेता. दरम्यान, आता ‘गदर 2’चा टीझर रिलीज झाला आहे.

टीझरबद्दल बोलयचे झाले, तर सुरुवातीलाच एका महिलेचा आवाज येतो की, ‘तो पाकिस्तानचा जावई आहे, त्याला नारळ द्या, टिका लावा, नाहीतर यावेळी तो तिला हुंडा म्हणून पाकिस्तानात घेऊन जाईल.’ यानंतर सनी देओल अँग्री यंग मॅनच्या रुपात एंट्री करताना दिसत आहे. टीझरमध्ये, सनी देओल रागाच्या भरात गाडीचे एक मोठे चाक घेऊन जाताना दिसत आहे आणि त्याच्या शत्रूंचा नाश करत आहे.

मंडळी, हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गदर 2’ रिलीज होण्याआधी, ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा सिनेमागृहामध्ये रिलीज झाला आहे, जो एक बॉलीवूड पीरियड अॅक्शन फिल्म आहे. यात शीख कुटुंबातील तारा सिंग आणि मुस्लिम असलेल्या सकीना यांची अप्रतिम प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. तीच कथा 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाली आहे, ज्याला प्रेक्षकांचा भन्नाट प्रतिसाद मिळत आहे.

11 ऑग्स्ट राेजी ‘गदर 2’ला टक्कर देण्याासाठी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ आणि कार्तिक आर्यन व कियारा आडवाणी स्टार ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट प्रदर्शित हाेत आहे.( bollywood movie gadar 2 teaser out sunny deol ameesha patel film watch video here)

अधिक वाचा –
आणखी काय हवं! ‘बिग बाॅस 16’नंतर पालटलं शिव ठाकरेचं नशीब, वाचा नेमकं घडलंय तरी काय
जेव्हा प्रसाद ओकने मंजिरीला सांगितला हाेता पहिल्या प्रेमाचा किस्सा, काय म्हणाली अभिनेत्री? लगेच वाचा

हे देखील वाचा