Tuesday, May 21, 2024

अनन्या पांडेने आदित्य राॅय कपूरसाेबतच्या नात्यावर साेडले माैन; म्हणाली, ‘लोकांना अंदाज लावू द्या…’

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. मात्र, असे असले तरी अभिनेत्रीने या नात्यावर  माैन बाळगले आहे आणि अभिनेत्री तिच्या आगामी ‘ड्रीम गर्ल 2‘ आणि ‘खो गए हम कहाँ‘ या चित्रपटांसाठी उत्साही आहे. अनन्या पांडेला अॅक्शन किंवा थ्रिलर प्रोजेक्टवर काम करायचे आहे.

अलीकडेच अभिनेत्री अनन्या पांडे (ananya panday) आणि आदित्य रॉय कपूर (aditya roy kapur) यांच्यातील नात्याने सर्वांचे लक्ष वेधले हाेते. गेल्या वर्षी डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दोघांनी एकत्र पोज दिल्याने या जाेडप्यांच्या अफवां चांगल्याच चर्चेत आल्या. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. त्यांच्या नात्याची नेमकी स्थिती काय आहे? याबद्दल काहीही न बोलता अनन्या पांडे म्हणाली,”जिज्ञासू असणे चांगले आहे, लोकांनी मी कोणाशी डेटिंग करत आहे याचा अंदाज लावला पाहिजे.”

एकीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे तिला कामाच्या आघाडीवर अपयशाचा सामना करावा लागला आहे. अनन्याचा आधीचा ‘लाइगर’ आणि ‘गहराइयां’ हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. या आव्हानांबाबत बाेलताना अनन्या म्हणाली की, तिला या चित्रपटांमधून अनेक माैल्यवाव गाेष्टी शिकता आल्या. यावर स्पष्टीकरण देताना अनन्या म्हणाली, “ या चित्रपटाद्वारे मला खूप काही शिकायला मिळाले. या चित्रपटातुन मी शिकलेला महत्वाचा धडा म्हणजे हार मानू नका आणि परिणामांबद्दल जास्त विचार करू नका,” असे अभिनेत्रीने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

अनन्या पांडेला तिच्या अभिनयामुळे अनेकांनी ट्रोलही केले आहे. खरे तर, अनेकांना वाटते की, अनन्याला अभिनय येत नाही आणि तिचे वडील चंकी पांडे यांच्या सदिच्छामुळे तिला चित्रपट मिळाले. ती लवकरच अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने ‘स्टूडेंट ऑफ द इयर 2’ , ‘लाइगर’, ‘गहराइयां’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.(bollywood actress ananya panday broke silence on the news of dating aditya roy kapur says let people guess)

आधिक वाचा- 
‘लागिरं झालं जी’ फेम नितिशची ‘ती’ पोस्ट व्हायरल; युजर म्हणाले, ‘अंगावर काटा येत‌ होता…’
‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ फेम अभिनेत्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी, जाणून घ्या काय करतेय सध्या?

हे देखील वाचा