Tuesday, June 18, 2024

जगावेगळा ड्रेस घालत अनुष्काने वेधले सगळ्यांचे लक्ष; पाहून नेटकरीही म्हणाले, ‘ही तर दिव्यासारखी….’

16 मे पासून सुरू झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023मध्ये अनुष्का शर्माने शुक्रवारी (दि. 26 मे)ला रेड कार्पेटवर आपली उपस्थिती दर्शवली. या खास प्रसंगी अनुष्काने ऑफ शोल्डर रिचर्ड क्विन गाऊन परिधान केला होता. जो सिल्वर आणि व्हाईट रंगाचा होता. अशात शुक्रवारी कान्सच्या रेड कार्पेटवर दिसलेल्या अनुष्काचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल हाेत आहेत. मात्र, या कार्यक्रमानंतर पार्टीत सहभागी झालेल्या अनुष्काचा लूक पाहून युजर्स गोंधळले आहेत. खरं तर, अनुष्का लॅम्पशेड आउटफिटमध्ये पार्टीत पोहोचली होती, जिथे तिचा गुलाबी टॉप अगदी हटके दिसत होता, ज्यामुळे अनुष्का चांगलीच चर्चेत आली आहे.

कान्सच्या रेड कार्पेटवर आपली उपस्थिती दर्शवल्यानंतर अनुष्का शर्मा (anushka sharma ) रात्री पार्टीत सामील झाली, ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा टॉप घातला होता. यासह, अनुष्काने त्याच रंगाचे ब्लॅक बॉटम आणि हील्स देखील घातले हाेते. अनुष्काचा गुलाबी कॉटन टॉप ऑफ शोल्डर होता. यासह अभिनेत्रीने लाे पोनीटेल आणि कमीतकमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

डाएट सब्याने अनुष्काचा पिंक आणि ब्लॅक आउटफिट लूक शेअर करत एक पोल केला, ज्यामध्ये ‘फॅशन पसंद आया’ आणि ‘ये क्या है’चा पर्याय देण्यात आला होता. अशात, 80 टक्के युजर्सने ‘हे काय आहे’ निवडले होते, तर 20 टक्के लोकांनी ‘फॅशन आवडली’ हा पर्याय निवडला होता.

यासोबतच आणखी एक पोल शेअर करण्यात आला, ज्यामध्ये अदिती राव हैदरी आणि अनुष्का यांच्यापैकी कुणाचा लूक आवडला असे विचारले हाेते, ज्यावर 79 टक्के लोकांनी अदितीचा लूक जास्त आवडला असे सांगितले. यासोबतच अनेक युजर्सनी अनुष्काच्या लूकची तुलना लॅंपसाेबत केली आहे. एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही लॅंपसारखे दिसत आहात.’, तर दुसऱ्याने लिहिले की, ‘या लोकांना असे कपडे कुठून मिळतात.'(Bollywood actress anushka sharma reached cannes party in pink dress users did not like it)

हे देखील वाचा