Tuesday, May 28, 2024

डेंग्यू झाल्यानंतर भूमी पेडणेकरने प्रकृतीबाबत दिले अपडेट; म्हणाली, ‘एका डासाने मला आठ दिवस…’

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण झाली आहे. तिला उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने बुधवारी सकाळी सोशल मीडियावर ही माहिती दिली. भूमीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत ती हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली दिसत आहे. भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक चित्रपट दिले आहेत, त्यापैकी अनेक हिट ठरले आहेत. मात्र, थँक्स फॉर कमिंग अभिनेत्रीची प्रकृती सध्या ठीक नाही.

भूमीने (Bhumi Pednekar) पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “डेंग्यूच्या एका डासाने मला 8 दिवस प्रचंड यातना दिल्या. पण आज जेव्हा मला जाग आली तेव्हा मला ‘व्वा’ असं वाटलं, म्हणून मला सेल्फी घ्यावी लागली.” भूमीने चाहत्यांना डेंग्यूबाबत सावध राहण्याचे आवाहनही केले. तसेच तिने माझी इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल माझ्या डॉक्टरांचे आभार. भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण झाल्याची ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांनी तिच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तिने पुढे लिहिले आहे की, “मित्रांनो, सावध राहा, कारण गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. अशा वेळी तुमची रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवण्यासाठी डासांपासून बचाव करणारे फार महत्वाचे असतात. उच्च प्रदुषणामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित झाली आहे. माझ्या ओळखीतल्या अनेकांना अलीकडेच डेंग्यू झाला आहे. एका अदृश्य विषाणूने माझी प्रकृती बिघडवली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

 भूमी पेडणेकर सध्या अनेक आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिचा ‘द लेडी किलर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. तिचा ‘मिमी’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेते प्राजक्ता कोळी आणि शांतनु माहेश्वरी होते. (Bollywood actress Bhumi Pednekar is infected with Dengue after posting information on social media)

आधिक वाचा-
बेबो म्हणू की लाल मिरची? करीनाचा सुपरहॉट लूक व्हायरल
‘बिग बॉस’ची नवी खेळी; स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी राखी सावंत पती आदिल खानबरोबर करणार प्रवेश?

हे देखील वाचा