Thursday, September 28, 2023

शाहरुख खानच्या ‘जवान’वर अभिनेत्री भूमी पेडणेकर फिदा; म्हणाली, ‘हा माणूस…’

शाहरुख खानचा ‘जवान‘ बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानचा ‘जवान‘ चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटातील शाहरुख खान, नयनतारा, दीपिका पदुकोण आणि विजय सेतुपती यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही ‘जवान’ पाहिला आणि तिला चित्रपट खूप आवडला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर ( Bhumi Pednekar) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. भूमीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. भूमीचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी काहीही करु शकतात. सध्या भूमी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावरून ‘जवान’ चित्रपटाचे कौतुक केले. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली.

पोस्ट शेअर करताना भूमीने लिहिले की, ” हा माणूस… यासाठीच शाहरुख खानला लिजेंट म्हणतात. ‘जवान’ चित्रपटातील प्रत्येक क्षण मला खूप आवडला. आम्ही रडलो, टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या. खरंच खूप अप्रतिम चित्रपट आहे. नयनतारा, तुझं काम खूप सुंदर आणि ताकदीचं झालं आहे. दीपिका पदुकोणचंही काम अप्रतिम आहे.”

तसेच भूमीने पुढे लिहीले की, “विजय सेतुपती, तुम्ही या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या चित्रपटातील गर्ल पॉवर – सान्या मल्होत्रा, पिलूमनी, गिरीजा ओक, लेहेर खान, इरिझा डोगरा, संगीता भट्टाचार्य… तुमच्या प्रत्येकीच्या कथेने हृदयात घर केलं आहे.” भूमी पेडणेकरच्या या पोस्टनंतर ‘जवान’ चित्रपटावरील चर्चा आणखी वाढली आहे.

‘जवान’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या पाच दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे 316 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या रविवारी या चित्रपटाने एकूण 80.1 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या पहिल्या सोमवारी हा चित्रपट सुरुवातीच्या आकडेवारीनुसार केवळ 30 कोटी रुपयांची कमाई करू शकला. रविवारच्या तुलनेत सोमवारच्या कमाईतील ही घसरण सुमारे 63 टक्के आहे.(Famous actress Bhumi Pednekar reacted after watching ShahRukh Khan movie Jawan)

अधिक वाचा-
अभिनेत्री नुसरत जहाँ यांची ईडीकडून ‘या’ प्रकरणात चौकशी सुरू; वाचा सविस्तर
पंडितांच्या घरात जन्माला येणार मुस्लिम बाळ? विकी कौशलच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ

हे देखील वाचा