Thursday, April 18, 2024

कपिल शर्मा शोबाबत भूमिका चावलाच माेठं वक्तव्य; म्हणाली, ‘तिथे गेल्याने चित्रपट मिळत नाही’

तेरे नाम‘ची निर्जला म्हणजेच भूमिका चावला हिला विसरणे साेप्पे नाही. सलमान खानसोबतची तिची केमिस्ट्री आणि चित्रपटातील ट्रॅजिक लव्हस्टोरी लोकांना खूप आवडली होती. अशात आता वर्षांनंतर अभिनेत्री ‘किसी का भाई किसी की जान‘मध्ये दिसली. या चित्रपटात तिची जोडी सलमान खानसोबत नाही, तर दक्षिणेतील अभिनेता व्यंकटेशसोबत होती. अशात अलीकडेच भूमिका हीने एका खुलासा केला आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

तर झाले असे की, ‘किसी का भाई किसी की जान’ रिलीज होण्यापूर्वी संपूर्ण टीमने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. यादरम्यान KKBKKJ चे कलाकार कपिल शर्मा शोमध्ये देखील पोहोचले. कपिलच्या शोमध्ये सलमान खान, पूजा हेगडे, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर दिसले होते. मात्र, भूमिका चावला गायब होती. या शोचे शूटिंग कधी झाले याचे भानही तिला नव्हते.

भूमिका चावलाने अलीकडेच माध्यमाशी संवाद साधला. मुलाखतीत अभिनेत्रीने शोमध्ये बोलावले नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. भूमिका चावला म्हणाली, “हे चित्रीकरण कधी झाले हे मला माहीत नव्हते, पण त्यांची काहीतरी रणनीती असावी. मला एका सेकंदासाठी खूप वाईट वाटले, पण नंतर मला वाटले की, व्यंकटेश सरही तिथे नाहीत. आम्ही चित्रपटात एक कपल आहोत.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी विचार केला की, व्यंकटेश सर तेथे नसताना मी एकटी काय करणार? चित्रपटातील तीन जोडप्यांना शोमध्ये बोलावण्यात आले होते, जे तरुण आहेत… त्यांचे समीकरण वेगळे आहे. तर ठीक आहे.”

कपिलच्या शोबद्दल बोलताना भूमिका म्हणाली, “देवाने मला एक चांगली गोष्ट दिली आहे की, मला एका सेकंदासाठी वाईट वाटते, पण मी कधीच मागे वळून पाहत नाही. मला माहित आहे की, कपिल शर्मा शोमध्ये गेल्याने मला पुढचा चित्रपट मिळणार नाही. मला पीआर करायचा असेल तर मी करूही शकतो. पण पीआर असूनही मला चित्रपटाची हमी मिळाली तर मी आज कपिल शर्माला फोन करून मला बाेलवून घ्या असे सांगेल. गॅरंटीने तुम्ही मला दुसऱ्या दिवशी चित्रपट आणून द्या.” असे भूमिका चावला हिने माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.(bollywood actress bhumika chawla felt bad for not being invited in the kapil sharma show during kkbkkj promotion)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
200 कोटींची पोटगी नाकारणाऱ्या समंथाने एकेकाळी पाहिलेत खूप वाईट दिवस, शिक्षणासाठीही नव्हते जवळ पैसे

“गेले होते काळारामाचे दर्शन घ्यायला पण…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

हे देखील वाचा