Monday, April 15, 2024

200 कोटींची पोटगी नाकारणाऱ्या समंथाने एकेकाळी पाहिलेत खूप वाईट दिवस, शिक्षणासाठीही नव्हते जवळ पैसे

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. गेल्या वर्षीच तिचा नागा चैतन्यपासून (Naga Chaitanya) घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही चित्रपटांमध्ये समंथाचे बोल्ड सीन आणि डान्स पाहून नागा आणि त्याचे कुटुंबीय खूश नव्हते, त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

समंथाने नागा चैतन्य देत असलेली 200 कोटींची पोटगी नाकारल्याच्या बातम्याही आल्या होत्या. तसे, समंथाची स्वतःची संपत्तीही कमी नाही, ती सुमारे 80 कोटींची मालकीण आहे. साऊथ इंडस्ट्रीत तिने आपले सर्वोत्तम स्थान निर्माण केले आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनतही घेतली आहे. (samantha ruth prabhu networth details and struggle story)

समंथाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने आतापर्यंत 65हून अधिक चित्रपट केले आहेत. हे स्थान मिळवणे समांथासाठी सोपे काम नव्हते. तिचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, समंथाच्या घरच्यांकडे तिला शिकवण्यासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत समंथाने मॉडेलिंगमध्ये हात आजमावला आणि पार्ट टाईम मॉडेलिंग केले. असे करून तिने तिच्या अभ्यासासाठी आणि घर चालवण्यासाठी पैसे मिळवले.

मॉडेलिंगच्या माध्यमातूनच समंथासाठी चित्रपटांचा मार्ग खुला झाला. 11वर्षांपूर्वी तिने ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते आणि त्यानंतर ती यशाच्या पायऱ्या चढत गेली. गेल्या वर्षी, ‘फॅमिली मॅन २’ मधील राजीच्या भूमिकेसाठी तिला खूप वाहवा मिळाली. याशिवाय ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या ‘ऊ अंटवा’ आयटम सॉंगनेही अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत भर घातली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
आमिर खानने पीएम मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे केले कौतुक; म्हणाला, ‘देशाच्या लोकांना…’

हे देखील वाचा