झक्कासच ना! सपना चौधरीच्या नवीन परफॉर्मन्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, डान्स स्टेप्सवर चाहतेही फिदा


आपल्या अदाकारी आणि ठुमक्यांमुळे नेहमी चर्चेत असणारी ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरीचा नुकताच आलेला एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मंगळवारी (१४ डिसेंबर) सपनाने तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे.

ब्राऊन कलरच्या कपड्यांमध्ये सपनाने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘बानो’ असे कॅप्शन टाकत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. इंस्टाग्रामवर चाहत्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवत कंमेटचा वर्षाव केला आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला ३० हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नृत्य करण्याबरोबरच सपना एक प्रसिद्ध गायिका देखील आहे. सपनाने दिल्ली आणि हरियाणामधील अनेक पार्ट्यांमध्ये तिचे गायन आणि नृत्य सादर केले आहे. हरियाणाच्या स्थानिक ऑर्केस्ट्रा टीममधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हरियाणाच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली सपना अगदी कमी वेळात ‘लाखो दिलो की धडकन’ बनली आहे.

सलवार-कमीज आणि दुपट्टयासह नृत्य करणे ही सपनाची खासियत आहे. खूप कमी कालावधीत तिने प्रसिद्ध गायिका म्हणून नाव कमावलं. सपनाने हरियाणवी गायिका म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आत्तापर्यंत तिने २० हून अधिक प्रसिद्ध गाणी गायली आहेत. ‘सॉलिड बॉडी’ या गाण्याने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. ‘लखीमचंद की टेक’ आणि ‘अलट-पलट’ ही दोन गाणी नुकतीच प्रदर्शित झाली आहेत.

सपना १२ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या उदर्निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी सपनाने नृत्य आणि गायन करण्यास सुरूवात केली. या कलेच्या माध्यमातून तिने पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यास सुरुवात केली.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!