चित्रपटांमधून कायम तृतीयपंथी भूमिका साकारून ओळख निर्माण केलेल्या बॉबी डार्लिंग सध्या आहेत कुठे?


तुम्हाला बॉबी डार्लिंग आठवते का? त्याच बॉबी डार्लिंग (Bobby Darling) ज्या बारमध्ये डान्स करायच्या. ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये तृतीयपंथीच्या अनेक भूमिका केल्या आहेत. ज्याने त्यांचे लिंग बदलले. त्यांचे लग्न देखील अतिशय त्रासदायक ठरले. त्यांना पॅरालिसिसचा झटकाही सहन करावा लागला होता. याच बॉबी मागील बऱ्याच दिवसांपासून या इंडस्ट्रीमधून गायब होत्या. पण आता बऱ्याच दिवसांनी त्यांनी त्यांचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्या खूप वेगळ्या दिसत आहे.

बॉबी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी चश्मा घातला असून, पिवळा मास्क चेहऱ्यावरून खाली लटकलेला दिसत आहे. सोबतच त्यांनी स्वेटर आणि गळ्यात स्कार्फ घातला आहे. त्यांचे तपकिरी केस आणि नोजरिंग सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये बॉबी खूपच वेगळ्या दिसत असल्या तरी त्यांचे हास्य अगदी पूर्वीइतकेच सुरेख आहे. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शेवटी चश्मा घातला ना. खूप दिवसांनी सिनेमा बघायला थिएटरमध्ये आले. ‘चंदीगड करे आशिकी’ हा एक अतिशय गोड चित्रपट असून एक मजबूत संदेशही देतो. जरूर पाहा.”

‘चंदिगड करे आशिकी’ या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. अभिषेक कपूरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बॉबी डार्लिंग यांनीही आपल्या संघर्षमय जीवनाचे चित्रण करणारा चित्रपट बनवावा, अशी इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. आयुष्मान खुरानाने त्यांची भूमिका साकारावी अशी देखील त्यांची इच्छा आहे. त्यांच्यामते तोच त्यांना न्याय देऊ शकतो.

पाखी शर्मा उर्फ ​​बॉबी यांनी स्वतःला स्त्री बनवण्यासाठी त्यांचे लिंग बदलले होते. त्यानंतर बॉबी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या रमणिक शर्माच्या प्रेमात पडल्या आणि दोघांनी लग्नही केले. या लग्नाने बॉबी यांना दुःखाशिवाय काही दिले नाही. लग्नानंतर लगेचच बॉबी यांनी पतीवर छळाचे आरोप करण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन त्यांनी रमणिक यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आणि दोघेही घटस्फोट घेत वेगळे झाले. करिअरबद्दल बोलायचे झाले तर बॉबी डार्लिंग यांनी वयाच्या २३ व्या वर्षी १८ वेळा तृतीयपंथीची भूमिका साकारून विक्रम केला.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर

 


Latest Post

error: Content is protected !!