Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

दीपिका-रणवीर पुन्हा एकत्र दिसणार पडद्यावर? अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करून वाढवली चाहत्यांची उत्सुकता

बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघेही आगामी प्रोजेक्टसाठी त्रिशा आणि राम चरणसोबत सामील झाले आहेत. रणवीरने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे चाहते मोठ्या खुलाशाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

व्हिडिओमध्ये दीपिका (deepika padukone) तिचा पती हरवल्याची तक्रार दाखल करताना दिसत आहे. नंतर स्क्रिनवर संदेश प्रदर्शित हाेताे की, “काही रहस्ये रहस्येच राहतील.” रणवीर त्याच्या पर्यवेक्षकला लक्ष्य सापडल्याची माहिती देत ​​फ्रेममध्ये प्रवेश करतो. व्हिडीओमध्ये त्रिशा पोलीस स्टेशनमध्ये दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करताना रणवीरने लिहिले की, “गुपिते उघड! @showme.the.secret #showmethesecret वर मोठ्या खुलाशासाठी संपर्कात राह. चाहत्यांनी देखील प्रसिद्ध कलाकारांच्या अभिनयाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. एका चाहत्याने लिहिले, “रणवीर तुझा लुक व्वा आहे.” तुम्हा दोघांना पुन्हा एकदा चांगला परफॉर्मन्स देताना पाहून खूप आनंद होत आहे.” , तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “ओएमजी दीपिका, रणवीर आणि रामचरण…कृपया त्यांना एका चित्रपटात कास्ट करा.” अशात आणखी एका चाहत्याने लिहिले, “मला सांगू नका की, ही जाहिरात आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीरच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता करण जाेहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या रिलीजची वाट पाहत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दुसरीकडे, दीपिका आता ‘फाइटर’मध्ये दिसणार आहे.( bollywood actress deepika padukone ranveer singh are back together on screen rocky aur rani kii prem kahaani actor shared video )

अधिक वाचा- 
‘आता खा आणि ओका…’, राज्यातील राजकीय भूकंपाबद्दल तेजस्विनी पंडितचं ट्वीट चर्चेत; लगेच वाचा
लंडनमधील विराट आणि अनुष्काचा ‘तो’ फोटो व्हायरल; अभिनेत्री म्हणाली, “फूल ऍन्जाय..”

हे देखील वाचा