Monday, February 26, 2024

दीपिकाने रेड कार्पेटवर रणवीरकडे केले दुर्लक्ष; ना हात धरला ना दिली एकत्र पोज, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड कलाकार कॅमेऱ्यासमोर काय करतात आणि काय नाही यावर लोक बारीक लक्ष ठेवून असतात. अशात अनेकवेळा अभिनेते काहीही बोलत नसले तरी त्यांच्याबद्दल खूप चर्चा होते. असेच काहीसे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्याबाबत सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. खरं तर, नुकतेच दीपिका – रणवीर इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 मध्ये पोहोचले होते. अशात दीपिकाने कॅमेऱ्यासमोर जे काही त्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे.

खरं तर, असं झालं की, दीपिका पदुकोण (deepika padukone) आणि रणवीर (ranveer singh) काल रात्री म्हणजेच गुरुवारी (दि. 23 मार्च)ला इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स या खेळाशी संबंधित कार्यक्रमात पोहोचले. यावेळी दीपिकासोबत तिचे वडील प्रकाश पदुकोणही दिसले. या इव्हेंटमध्ये जेव्हा दीपिका तिच्या कारमधून रेड कार्पेटवर उतरली, तेव्हा रणवीरने तिच्यासोबत चालण्यासाठी हात पुढे केला. मात्र, दीपिका तिच्या वडिलांसोबत चालताना दिसली. अशात हा व्हिडिओ पाहून लोक म्हणू लागले की, अभिनेत्री रणवीरकडे दुर्लक्ष करत आहे.

या व्हिडिओवर अशा अनेक कमेंट्स येत आहेत, ज्यात लोक त्यांच्या बाँडिंग आणि भांडणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की,”दीपिका रागावली आहे, तिने रणवीरचा हात धरला नाही.” तर काही युजर्स हे जाेडपे वेगळे हाेणार असल्याचे सांगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील भांडणाच्या अफवा समोर आल्याने लोकांना धक्का बसला हाेता. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र, यादरम्यान दोघांनीही सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून या अफवांचे खंडन केले हाेते.(bollywood actress deepika padukone ranveer singh video goes viral netizens saying she is not holding his hand looks like romance ended soon)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तामिळ सुपरस्टार अजित कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

पारंपरिक वेशभूषेत कीर्तीने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा