Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

दीपिकाने शेअर केला एक्स बाॅयफ्रेंड रणबीरसोबतचा ‘ताे’ व्हिडिओ, कारण जाणून व्हाल थक्क

बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबतचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. अखेर असे काय झाले की, दीपिकाला रणबीरची इतकी आठवण आली की तिने अभिनेत्यासाेबतची एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. इतकेच नाही, तर अभिनेत्रीने या स्टाेरीसाेबत एक अतिशय अर्थपूर्ण कॅप्शनही लिहिले आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये रणबीर आणि दीपिका दिसत आहेत. खरेतर, ही क्लिप ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील आहे. या साेबतच व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या हृदयाचा तुकडा, आत्मा’. या पोस्टशिवाय अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवरून आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये दीपिका आणि रणबीरचे कार्टून दिसत आहे. हा व्हिडीओ अतिशय रोमँटिक पद्धतीने बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांचे कपाळाला कपाळ लावून आहेत.

खरेतर, ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा परिस्थितीत दिग्दर्शक अयान मुखर्जीने खुलासा केला की, आजपर्यंत त्याने आपला हा चित्रपट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फ्लोमध्ये पाहिलेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

यासोबतच अयान मुखर्जीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यानचे सर्वोत्तम क्षण चाहत्यांसह शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी लिहिले, “ये जवानी है दिवानी’ माझे दुसरे अपत्य आहे. माझ्या हृदयाचा एक तुकडा आज 10 वर्षांचा झाला आहे. मला वाटतं इतक्या वर्षांनंतर मी आज आत्मविश्वासाने सांगू शकतो की, चित्रपट बनवणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक काम आहे.” असे दिग्दर्शकाने व्हिडिओ पाेस्ट करताना सांगितले.(Bollywood actress deepika padukone shared a video with ranbir kapoor after 10 years here is why actress remembers alia bhatt husband )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्जुनला का आवडतात ‘श्रुती’ नावाच्या मुली? अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा, व्हिडिओ एकदा पाहाच

“…मोठेपण यायला बालपण जपून ठेवावे लागते” मराठी अभिनेत्रीच्या ‘त्या’ सुंदर पोस्टने वेधले सर्वांचेच लक्ष

हे देखील वाचा