Tuesday, June 18, 2024

प्रग्नेंट आईसोबत भारतात आली, बॉम्बस्फोटात गमावली भावंडं; अरबाजच्या शोमध्ये भावूक झाली हेलन

70 ते 80च्या दक्षकातील प्रसिद्ध अभिनेत्री हेलन सध्या ‘द इनव्हिन्सिबल्स विथ अरबाज खान’ या शोमुळे चर्चेत आहे. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. एकेकाळी हेलन आणि सलीम खान यांचे अफेअर होते हे सर्वांना माहीत आहे. सलीमसोबतच्या त्यांच्या रोमान्सचे किस्से घराघरात प्रसिद्ध आहेत. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात यापेक्षाही बरेच काही घडले हाेते, ज्याबद्दल त्यांनी आता उघडपणे सांगितले आहे.

हेलन (helen) यांनी अलीकडेच त्यांचा सावत्र मुलगा अरबाज खान याच्या शोमध्ये सांगितले की, “माझे तारुण्य अडचणीतून गेले होते.” आपल्या खडतर प्रवासाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “मी लहान वयातच आपला भाऊ गमावला. म्यानमारमधून भारतात येण्यासाठी मी माझ्या प्रेग्नंट आईसाेबत नऊ महिने खडबडीत प्रदेशातून ट्रेक केला होता. त्याच काळात जपानी आक्रमण झाले, ज्यामुळे सुमारे 300-350 लोक स्थलांतरित झाले. एवढेच नाही, तर शेवटचे उड्डाण घेण्यासाठी आम्ही बर्मा विमानतळावर गेला तेव्हा जपानी लोकांनी येऊन संबंधित विमानावर बॉम्बफेक केली. तो काळ खूप कठीण होता. त्यामध्ये मी माझा भाऊ आणि बहीण गमावली.”

या चॅट शोमध्ये त्यांनी त्यांच्या जगण्याच्या पद्धतीबद्दलही सांगितले. अभिनेत्री म्हणाल्या की, “त्या धार्मिक नाही, तर आध्यात्मिक आहे.” यावेळी अरबाजने अभिनेत्रीला विचारले की, ‘सकारात्मक जीवन जगण्याचा त्यांचा काय मार्ग आहे.’ यावर अभिनेत्री म्हणाल्या की, “माझी देवावर खूप श्रद्धा आहे आणि जे घडायचे आहे ते घडतेच असा माझा विश्वास आहे. माझा नियतीवर देखील खूप विश्वास आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Bubble (@bollywoodbubble)

विशेष म्हणजे हेलन आणि सलीम खान यांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती, जेव्हा 1981 मध्ये दोघांनी लग्न केले होते. कारण, सलीम आधीच विवाहित होते आणि सलमान, अरबाज, सोहेल आणि अलविरा या चार मुलांचे वडिल होते.  (bollywood actress helen talks about her struggling days says he wandered for nine momths with pregnant mother lost siblings )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
देवदूताच्या रुपात आली होती श्रीदेवी; एका निर्णयाने बदलले चित्रपट निर्मात्याचे आयुष्य

एक्स गर्लफ्रेंड सारासाेबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंवर कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा