Sunday, April 14, 2024

जेव्हा धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसाठी बुक केले हाेते संपूर्ण हॉस्पिटल, कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी जगाला माहीत आहे आणि आजही त्यांच्या प्रेमाच्या प्रसिद्ध कथा सांगितल्या जातात. हेमा मालिनी यांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी धर्मेंद्रही मागे हटत नाहीत, पण तुम्हाला माहित आहे धर्मेंद्र यांनी हेमासाठी नर्सिंग होममध्ये 100 खोल्या बुक केल्या होत्या. यामागचे कारण आम्ही तुम्हाला सांगतो.

खरं तर, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी (hema malini) यांची मैत्रिण नीतू कोहली हिने ही गोष्ट सर्वांना सांगितली. ही गाेष्ट हेमा आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशाच्या जन्माची आहे, जेव्हा हेमाला हे सिक्रेट ठेवायचे होते. त्यादरम्यान धर्मेंद्रने प्रेग्नंसीदरम्यान शेवटच्या महिन्यात हेमाला दाखल केलेल्या नर्सिंग होममधील सर्व 100 खोल्या बुक केल्या. धर्मेंद्रने संपूर्ण हॉस्पिटल बुक केले होते हे कोणालाच माहीत नव्हते.

धर्मेंद्र यांनी धर्म बदलून हेमा मालिनीसोबत लग्न केले. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. विवाहित असतानाच धर्मेंद्र हेमाच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि 2 मे 1980 रोजी हेमाशी लग्न केले. त्यानंतर पुढच्या वर्षी 2 नोव्हेंबर 1981 रोजी ईशा देओलचा जन्म झाला.

धर्मेंद्र आणि हेमा यांनी ‘शोले’, ‘शराफत’, ‘ड्रीम गर्ल’, ‘सीता और गीता’, ‘अलिबाबा और 40 चोर’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. या दोघांनी 1970 मध्ये ‘तुम हसीन में जवान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डेट करायला सुरुवात केली आणि नंतर 1980 मध्ये लग्न केले.

अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. यासाेबतच शबाना आझमी, जया बच्चन हे देखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकाकरताना दिसणार आहेत. हा चित्रपट 28 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. ( bollywood actress hema malini revealed dharmendra booked 100 bed entire hospital for daughter esha deol birth )

अधिक वाचा-
‘कॅंडीलॅंड’मधील मितालीचं तरुणाईला घायळ करणार साैंदर्य, फाेटाे एकदा पाहाच

बोल्ड अँड ब्यूटीफुल! मोनोलीसाचा बिकीनी अंदाज एकदा पाहाच

हे देखील वाचा