Friday, May 24, 2024

धर्मेंद्र यांनी भावूक पाेस्ट शेअर करून मुलींची मागितली माफी; लेक ईशा देओल म्हणाली, ‘तुम्ही सर्वोत्तम आहात’

बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांनी त्यांच्या काळात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. एक काळ असा होता की, लाखो मुली धर्मेंद्र यांच्यासाठी वेड्या हाेत्या. अशात आता अभिनेता 87 वर्षांचे झाले आहे. असे असेले तरी धर्मेंदजी अजूनही अभनिय क्षेत्रात सक्रिय आहे. तसेच, वयाच्या या टप्प्यावरही ते त्यांच्या चाहत्यांशी जोडले आहेत आणि स्वतःशी संबंधित प्रत्येक अपडेट त्याच्या चाहत्यांशी शेअर करत असतात, ज्यामध्ये ते त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांना सांगतात. या सगळ्यात अलीकडेच त्यांनी ईशा आणि आहाना यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मनातील व्यथा मांडल्या आहेत.

धर्मेंद्र देओल (dharmendra ) यांनी अलीकडेच मुलगी ईशा देओलसोबतचा फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “ईशा, अहाना, हेमा आणि माझ्या सर्व प्रिय मुलांनो… तख्तानी आणि वोहरा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्हा सर्वांचा मनापासून आदर करतो…वय आणि आजारपण मला सांगतंय की, मी तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलू शकलो असतो… पण”

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

धर्मेंद्र यांच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका चाहत्याने लिहिले की, ‘धर्मेंद्र जी तुम्ही सर्वोत्तम आहात’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘आम्ही तुमच्यावर प्रेम करतो’. याशिवाय धर्मेंद्र यांच्या या पोस्टवर अनेक चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

धर्मेंद्र यांच्या पोस्टवर मुलगी ईशाची प्रतिक्रियाही समोर आली असून वडिलांच्या भावनिक पाेस्टवर उत्तर देताना तिने लिहिले, ‘लव्ह यू पापा. तुम्ही सर्वोत्तम आहात. मी तुमच्यावर खुप प्रेम करते आणि तुम्हाला ते माहित आहे. नेहमी आनंदी आणि निरोगी रहा. तुमच्यावर प्रेम आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

वयाच्या 87व्या वर्षीही धर्मेंद्रजी बॉलिवूडमध्ये खूप सक्रिय आहेत. ते रिअॅलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून सहभागी होत असताना दिसतात. अशातच ते करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय ते ‘अपना 2’ मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘आपने’चा सीक्वल असेल. धर्मेंद्र यांचा नातू करण देओलही या चित्रपटात सहभागी होणार आहे.(bollywood actor dharmendra wrote an emotional note for hema and both daughters isha and ahana )

हे देखील वाचा