Tuesday, September 17, 2024
Home अन्य ‘आम्ही एका घरात राहत नाही, पण नेहमीच…’, धर्मेंद्रपासून वेगळे राहण्यावर हेमाने साेडले मौन

‘आम्ही एका घरात राहत नाही, पण नेहमीच…’, धर्मेंद्रपासून वेगळे राहण्यावर हेमाने साेडले मौन

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांची जीवनसाथी म्हणून निवड केली. दोघांची लव्हस्टोरी कोणापासून लपलेली नाही. आपले प्रेम परिपूर्ण करण्यासाठी हेमा आणि धर्मेंद्र यांनी धर्म परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र, आता हेमा मालिनी धर्मेंद्रपासून वेगळ्या घरात राहतात. सर्व अडथळे पार करून लग्न करणारी हेमा पतीपासून का विभक्त राहते, यावरही अनेकदा लोक कमेंट करताना दिसतात. अशात हेमा मालिनी यांनी नुकतेच यावर मौन सोडले आहे.

हेमा मालिनी (hema malini) सांगतात की, ‘धर्मेंद्रपासून वेगळ्या घरात राहणे त्यांना वाईट वाटत नाही. ‘माध्यमांशी संवाद साधताना हेमा महिला म्हणाल्या, ‘असं जगणं कुणालाही आवडत नाही, पण असं होतं.’ अभिनेत्री पुढे म्हणाली की, प्रत्येक स्त्रीला सामान्य कुटुंबाप्रमाणे नवरा आणि मुले हवी असतात. मात्र, धर्मेंद्र यांच्यापासून वेगळे राहणे मला वाईट वाटत नाही.’ याशिवाय त्यांनी हेही सांगितले की, ‘त्या आणि धर्मेंद्र एकत्र राहत नसले, तरी धर्मेंद्र नेहमीच अडचणीत त्यांच्यासाेबत उभे असतात. हेमा आणि धर्मेंद्र यांचे लग्न 1980 मध्ये झाले होते.

हेमाच्या आधी धर्मेंद्रचे लग्न प्रकाश कौरशी झाले होते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुले आहेत. सनी देओल आणि बॉबी देओल व्यतिरिक्त या जोडप्याला दोन मुली आहेत अजिता आणि विजेती. त्याचबरोबर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा आणि आहाना देओल या दोन मुलीही आहेत. हेमा मालिनी चित्रपटांव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय आहेत. त्या उत्तर प्रदेशातील मथुरा येथील खासदार आहेत.(bollywood actress hema malini says she doesn feel bad about living in separate house from husband dharmendra )

अधिक वाचा-
प्रिती झिंटाने केले जुळ्या मुलांचे मुंडण, फाेटाे शेअर करत सांगितले विधीचे महत्त्व
राखीने सांगितला 15 दिवसात टोमॅटो पिकवण्याचा भन्नाट उपाय; म्हणाली, ‘सात जन्मासाठी उपयुक्त…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा