Monday, July 1, 2024

जान्हवी तमिळ चित्रपटातून साऊथमध्ये ठेवणार पाऊल? वडील बोनी कपूर यांनी सांगितले व्हायरल बातमीचे सत्य

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय कौशल्याचा बळावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्मान केले. अशात गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर साऊथ फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की  अभिनेत्री एका तमिळ चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण करू शकते. मात्र, ती तमिळ चित्रपटांमध्ये पदार्पण करत असल्याच्या या सर्व बातम्या अफवा आहेत. खरं तर, अलीकडेच जान्हवीचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांनी अभिनेत्रीच्या साउथ डेब्यूच्या अफवा फेटाळून लावल्या. निर्मात्याने खुलासा केला की, त्यांच्या मुलीने अद्याप एकही तमिळ चित्रपट साइन केलेला नाही.

बोनी कपूर (boney kapoor) यांनी त्यांची मुलगी जान्हवी कपूर (janhvi kapoor) हिच्या साऊथ डेब्यूच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आणि लिहिले, ‘प्रिय मीडिया मित्रांनो, तुम्हाला कळवू इच्छितो की, जान्हवी कपूरने सध्या एकही तामिळ चित्रपट साइन केलेला नाही. आपणास विनंती आहे की, खोट्या अफवा पसरवू नये.’

काही दिवसांपूर्वी जान्हवीने एका कार्यक्रमात साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अभिनेत्री म्हणाली होती, ‘माझ्याकडे सध्या ‘बावल’ हा चित्रपट आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. यासोबतच ‘मिस्टर अॅन्ड मिसेज माही’ देखील आहे, पण मी लवकरच दक्षिणेतील चित्रपट करेन अशी माझी आशा आहे.’ तेव्हापासून जान्हवीच्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याबाबत अंदाज बांधला जात हाेता. मात्र, आता हे सर्व वृत्त अफवा असल्याचे बोनी कपूर यांच्या ट्विटनंतर स्पष्ट झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूर हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘मिली’, ‘धडक’, ‘दाेस्ताना 2’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (bollywood actress janhvi kapoor boney kapoor reacts on daughter south debut with a tamil film )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
धक्कादायक! दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार असणाऱ्या नयनताराने देखील घेतला होता कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव

‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा