Friday, May 24, 2024

झगा मगा अन् मला बघा, जान्हवीला फॅशन पडली चांगलीच महागात

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सतत तिच्या चित्रपटांमध्ये व्यस्त असते. तिने ‘मिली‘, ‘धडकन‘, ‘रुही‘ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. यासोबतच जान्हवी अनेक जाहिरातीही शूट् करत असते. नुकतीच जान्हवी एका सुंदर घाघऱ्यात दिसली. शूटसाठी जातानाचा तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे जान्हवी चांगलीच चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये ती पॅपराझीला ‘गुप्तहेर’ म्हणत आहे.

जान्हवीने स्टाईलिश पाेशाखात वेधले चाहत्यांचे लक्ष
जान्हवी (Janhvi Kapoor) हिचा समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या व्हॅनिटीमधून शूट लोकेशनकडे जाताना दिसत आहे. याव्हिडिओमध्ये तिने डिझायनर घाघरा घातला आहे आणि काही लोक तिचा घाघरा धरून चालत आहेत. जेव्हा पॅपराझी तिचे फोटो काढू लागतात तेव्हा जान्हवी म्हणते, ” तुम्ही लाेक गुप्तहेर करायला येऊन जाता.” मात्र, जान्हवीने सर्वांनाच छान पोज दिली. जान्हवी कपूरचा स्टाईलिश पोशाख तिच्यावर खूपच सुंदर दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जान्हवीचा हा स्टायलिश लूक काेणत्या शूटसाठी होता, सध्या त्याची माहिती मिळालेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार, जान्हवीने तिच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. तिचा ‘मिली’ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. यानंतर जान्हवीने काही दिवस ब्रेक घेतला. यादरम्यान जान्हवीने अल उलाला भेट दिली होती आणि तिथले फोटोही सोशल अकाउंटवर शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 जान्हवी रुपेरी पडद्यावर लवकरच दिसणार राजकुमार रावसाेबत
येत्या काही दिवसांत जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आहे. यानंतर ती अली अब्बास जफरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. (bollywood actress janhvi kapoor comments on paparazzi looks stunning in shimmer lehenga)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रसिका सुनिल उर्फ शनायाच्या फोटोंनी सोशल मीडियाचे वाढवले तापमान, फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंटचा वर्षाव
चित्रपट पाहा संस्कृती आणि सभ्यताला जपत जा, म्हणत कांताराप्रेमिंनी रश्मिका मंदानावर साधला निशाना

हे देखील वाचा