Tuesday, May 21, 2024

जया बच्चन यांंनी सांगितला मासिक पाळीचा अनुभव; म्हणाल्या, ‘झाडामागे जाऊन…’

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda) सध्या चित्रपट जगापासून दूर असली तरी ती खूप प्रसिद्धीच्या झोतात राहते. नवीन सध्या तिच्या पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल नव्या’मुळे चर्चेत आहे. नव्याने अलीकडेच पॉडकास्टमध्ये तिच्या फॅमिलीशी संबंधित काही किस्से शेअर केले आहेत. पॉडकास्टमध्ये, नव्याला तिची आई श्वेता बच्चन आणि तिची आजी जया बच्चन(Jaya Bachchan) यांच्यासोबत ‘पीरियड’ आणि ‘रिप्रॉडक्टिव्हिटी’वर स्पष्ट संभाषण करताना दिसले. यादरम्यान नव्याने तिच्या आजी आणि आईला त्यांच्या पहिल्या मासिक पाळीच्या अनुभवावर प्रश्न विचारले.

नव्याने तिच्या पॉडकास्टमध्ये तिची आजी जया बच्चन यांना तिच्या पहिल्या मासिक पाळीच्या अनुभवाबद्दल विचारले. नव्याने जया बच्चन यांना विचारले की तुम्हाला तुमचा पहिला पीरियडचा अनुभव आठवतो का? यावर जया बच्चन यांनी उत्तर दिलं, ‘हो, मला नक्कीच आठवते.’ त्या म्हणाल्या, “एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला मासिक पाळी आली. चित्रीकरणासाठी जावं लागायचं आणि त्यावेळी व्हॅनिटी व्हॅनची सोय नव्हती. अशावेळी बस किंवा झाडामागे जाऊन पॅड बदलावा लागायचा. अशाप्रकरचे प्रसंग खूप विचित्र होते. यावेळी मासिका पाळीची लाज वाटायची.”

 

View this post on Instagram

 

पुढे म्हणाल्या की, त्यावेळी पॅड कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकणं शक्य नव्हते. अशावेळी प्लास्टिक बॅग आम्ही आमच्याबरोबर ठेवायचो आणि घरी येऊन फेकायचे. तेव्हा सॅनिटरी पॅड नव्हे तर सॅनिटरी टॉवेल असायचे. सॅनिटरी टॉवेल आम्ही वापरायचो. चित्रीकरणादरम्यान चार ते पाच सॅनिटरी टॉवेल एकाचवेळी वापरत असाल तर खाली बसण्याची कल्पनाच तुम्ही करू शकत नाही.” जया बच्चन यांचा हा अनुभव खरंच विचार करायला लावणारा आहे.

नव्या नवेलीने पॉडकास्टमध्ये तिची आई श्वेता बच्चन यांनाही अनेक प्रश्न विचारले. मासिक पाळीदरम्यानचा तुझा अनुभव कसा होता? याबाबत श्वेताने आधी तिच्या आईला विचारलं. यावेळी श्वेता म्हणाली, “यादरम्यान तुम्हाला असं वाटतं की झोपून राहावं. चॉकलेट खावं. एकटंच राहावं.” पण जया बच्चन यांचा त्यांच्या मासिक पाळीदरम्यानचा अनुभव काही वेगळाच होता.

नव्या नवेलीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेले नाही. पण, ती अनेकदा मीडियाच्या चर्चेत असते. आजकाल नव्या तिच्या पॉडकास्ट शोद्वारे चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. मागे त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याविषयी सांगितले. यावेळी ती पीरियड्सवर बोलताना दिसली आहे. नव्या नवेली नंदा अनेकदा आई आणि आजी जया बच्चनसोबत अनेकदा प्रश्न विचारताना दिसते. ती आपल्या कुंटुबांचे किस्से शेअर करताना दिसते. कधीकधी तर नव्या नवेली बच्चन कुंटुबासंबंधित अशा खुलासे करते की, जे एकून चाहते ही थक्कहून जातात.(jaya bachchan shweta bachchan shared their first period experience in navya naveli nanda podcast)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माहिरा शर्माने बोल्डनेसची हद्दच केली पार, पाहा बोल्ड फोटोशूट

मुलीचे नाव केले उघड! बिपाशा बासू-करण सिंगने शेअर केली मुलीची पहिली झलक

हे देखील वाचा