वैतागलेले वडिल जेव्हा कंगनाच्या कानाखाली मारायला लागले, तेव्हा पंगा क्वीन कंगना म्हणाली..


‘कंगना राणावत’ ही बॉलिवूड मधील त्या अभिनेत्रींमध्ये आहे, ज्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात.ती नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. ट्विटरवर देखील ती अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडताना दिसते. त्यामुळे अनेक वेळा ती वादाचा विषय बनते.शेतकरी आंदोलनावर देखील तिने ट्विट केले होते, जे खूपच वादग्रस्त होते.

बॉलिवूड पंगा क्वीन कंगनाने नुकतेच आपल्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने ट्विट करून सांगितले आहे की, ती कशी वयाच्या 15 व्या वर्षीच बंडखोर बनली आणि तिने तिच्या वडिलांविरोधात भूमिका घेतली होती.

अभिनेत्री कंगना राणावत हिने ट्विट केले आहे की, ” माझ्या वडिलांकडे लायसेंस्ड सेन्सटिव्ह रायफल आणि बंदूक होती. लहान असताना ते आम्हाला काही गोष्टी सांगत नसायचे तर ओरडत असायचे. त्यांचा आवाज माझ्या नसानसात भिनला होता. त्यांच्या तारुण्यात ते आपल्या कॉलेजच्या गॅंगमधे मारामारी करण्यात तरबेज होते. त्यामुळे त्यांना सगळेजण गुंड या नावाने संबोधत असे. मी तर 15 व्या वर्षीच त्यांच्या सोबत भांडणं केली होती आणि घर सोडून निघून आली होती. 15 व्या वर्षीच मी पहिल्यांदाच एक बंडखोर मुलगी झाले होते.”

त्यानंतर कंगनाने दुसरे ट्विट केले आहे , त्यात ती असे म्हणते की, ” या चिल्लर इंडस्ट्रीला असे वाटते की , यशाची हवा माझ्या डोक्यात गेली आहे आणि तीच हवा माझ्या तोंडून बोलत असते आणि त्यांना असे वाटते की, ते मला नीट करू शकतात. परंतु मी आधीपासूनच बंडखोर आहे. हा फक्त आता यश मिळाल्यानंतर मी माझी मतं जरा स्पष्ट मांडते आणि इतिहास देखील या गोष्टीला साक्ष आहे की, ज्यांनी कोणी मला बदलण्याचा प्रयत्न केला आहे, मीच त्यांना ठीक केले आहे.”

कंगना एवढ्यावरच नाही थांबली तर तिने आणखी एक ट्विट केले आहे, त्यात तिने सांगितले आहे की,” माझ्या वडिलांना असे वाटत होते की, मी एक सर्वोत्तम डॉक्टर बनावं. आम्हाला एका चांगल्या इंस्टीट्युटमध्ये शिकवून ते एका क्रांतीकारी वडीलांचे पात्र निभावत आहे असे त्यांना वाटत होते. पण जेव्हा मी शाळेत जाण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी मला एक कानाखाली मारण्याचा पर्यंत केला. तेव्हा मी त्यांना म्हणाले की , जर तुम्ही मला कानाखाली मारू शकता तर मी देखील मारू शकते.”

यानंतर पंगा गर्लने सांगितले की, “तो एका वडील आणि मुलीच्या नात्यातला शेवट होता. माझ्या वडिलांनी तेव्हा एकदा माझ्याकडे पाहिले मग माझ्या आईकडे पाहिले आणि त्यांच्या खोलीत निघून गेले. मला माहित होत की, तेव्हा मी माझ्या मर्यादा पार केल्या होत्या आणि तेव्हापासून माझे वडील माझ्यापासून कायमचे दुरावले. परंतु मी एका पिंजऱ्यात कधीच नाही राहू शकत, मी माझ्या स्वातंत्र्यासाठी काहीही करू शकते.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.