Monday, April 15, 2024

तुनिषा शर्माच्या मृत्यूवर कंगना रणौतने तोडले मौन; म्हणाली, ‘मी पंतप्रधानांना …’

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच तिने तुनिषा शर्माच्या मृत्यूबद्दलचे आपले विचार तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. 24 डिसेंबरला तुनिषा तिच्या टीव्ही शो ‘अलिबाबा: दास्तान-ए-काबुल‘च्या सेटवर मृतावस्थेत आढळून आली होती. सध्या मुंबई पोलिस अभिनेत्रीच्या मृत्यूचा तपास करत आहेत. त्याच वेळी, कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पाेलीगॅमी आणि ऍसिड हल्ल्यांपासून’ महिलांच्या संरक्षणासाठी नवीन कायदे करण्याची विनंती केली आहे.

कंगना (kangana ranaut ) हिने इंस्टाग्रामवर एक लांबलचक नोट शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, “स्त्री प्रेम, लग्न, नाते किंवा जवळच्या नातेवाईकाची कमतरता सहन करू शकते, पण तिच्या प्रेमकथेत कधीच प्रेम नव्हतेच हे ती सहन करु शकत नाही. याशिवाय कंगनाने तुनिषाच्या मृत्यूला ‘हत्या’ म्हटले आहे. तिने पुढे लिहिले, “अशा परिस्थितीत जगणे किंवा मरणे याचा काहीही फरक पडत नाही, पण तिने हे एकटिने केलेले नाही. ही हत्या आहे.”

kangana-ranaut
Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

कंगनाने तिच्या नोटमध्ये पुढे लिहिले की, “मी माननीय पंतप्रधानांना विनंती करते की, जसा कृष्ण द्रौपदीसाठी उभा राहिला, रामाने, ज्याप्रकारे सीता मातेसाठी भूमिका घेतली. त्याचप्रमाणे तुम्ही पाेलीगॅमी विरोधात कठोर कायदा करावा अशी आमची विनंती आहे.”

kangana-ranaut
Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी तिचा प्रियकर शीजान खान संशयित मानला जात आहे. तुनिषाच्या मृत्यूपासून शीजान पोलिसांच्या ताब्यात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, तुनिषाच्या मृत्यूच्या काही आठवड्यांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते. तुनिषा आणि शीजान सब टीव्हीच्या ‘अलिबाबा: दास्तान-ए-काबुल’ या शोमध्ये एकत्र काम करत होते. या शोमध्ये तुनिषा ‘प्रिन्सेस मरियम’च्या भूमिकेत दिसली होती, तर शीजान ‘अली बाबा’ची भूमिका साकारत होता.(bollywood actress kangana ranaut reacts to actress tunisha sharma death says i request to pm modi against polygamy)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सीमा सजदेह मद्यधुंद अवस्थेत पाेहचलेली घरी, तेव्हा काय हाेती मुलाची प्रतीक्रिया?

अर्रर्र! अजयच्या लेकीनं कुणाला बघून ठाेकली धूम?, पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा