बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रणौत ही आजकाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कंगना ही आपला येणारा बिग बजेट सिनेमा ‘धाकड’ च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या मध्यप्रदेशमध्ये होत आहे. या चित्रपटासाठी कंगना खूपच मेहनत घेताना दिसत आहे. यासोबतच या सिनेमासाठी खूप पैसा देखील खर्च होत आहे. या गोष्टीचा खुलासा स्वत: कंगनाने आपल्या चाहत्यांसमोर केला आहे. नुकताच कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, ‘धाकड’ या सिनेमासाठी 25 कोटी रुपये खर्च करून सेट उभारला आहे.
कंगनाने एका ऍक्शन सीनचा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवर असे लिहले आहे की, ‘मी असा डाटेक्टर आजपर्यंत नाही पहिला जो प्रॅक्टिसला एवढा वेळ आणि महत्त्व देतोय. यात आतापर्यंतचा सर्वात मोठा ऍक्शन सिक्वेन्स शूट केला जाणार आहे. परंतु त्याची तयारी करून मी हैराण झाले आहे. 25 कोटी पेक्षाही जास्त पैसा एका ऍक्शन सिक्वेन्सवर खर्च केला जातोय.’
https://twitter.com/KanganaTeam/status/1357593178589782017
https://twitter.com/KanganaTeam/status/1351053969708216320
‘रजनीश घई’ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘धाकड’ या सिनेमात कंगना एजेंट अग्नी हिचं पात्र निभावणार आहे. हा सिनेमा याच वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीझ होणार आहे. या सिनेमात कंगना आणि अर्जुन रामपाल यांच्या व्यतिरिक्त दिव्या दत्ता ही देखील महत्त्वाच्या भूमिकेत असेल. या सिनेमाव्यतिरिक कंगनाने तिच्या इतर सिनेमाबद्दल देखील सांगितले आहे. चित्रपटाचं नाव ‘मणिकर्णिका रिटर्न: द लिजंड ऑफ दिद्दा’ हे आहे. तसेच कंगनाचे अजून दोन सिनेमे रिलीझ होणार आहेत. ‘तेजस’ आणि ‘थलायवी’ ही तिच्या चित्रपटांची नावे आहेत.
कामाव्यतिरिक्त कंगनाबद्दल बोलायचे झाल्यास, ती तिच्या स्टाईल मुळे खूपच चर्चेत असते. शेतकरी आंदोलन जेव्हा पासून सुरू झाले आहे, तेव्हापासून कंगना ही सरकारचा पक्ष घेऊन हा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. कंगनाने पॉप सिंगर रिहाना हिच्या ट्विटवर शेतकऱ्यांना आतंगवादी असे संबोधले आहे. त्यामुळे या दिवसात कंगना तिच्या सिनेमांपेक्षा इतर गोष्टींमुळे सोशल मीडियावर चर्चित आहे.
हेही वाचा-
अभिनेत्री कंगना रणौत लवकरच होणार पंतप्रधान, अशाप्रकारे करणार काम सुरु
बहीण असावी तर कंगनासारखी! भावंडांना गिफ्ट केलेल्या फ्लॅटची किंमत वाचून शाॅक बसेल; जाणून घ्या