कंगनापाठोपाठ अर्जुन रामपाल-दिव्या दत्तचा ‘धाकड’ सिनेमातील फर्स्ट लूक चाहत्यांसमोर, पाहा एका क्लिकवर येथे


बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. कंगनाने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ‘धाकड’ हा चित्रपट पहिला महिला अ‍ॅक्शन चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात कंगना एका महिला गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कंगनाशिवाय अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहे. आता हळूहळू या चित्रपटातील इतर कलाकारांचाही पहिला लुक समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता अर्जुन आणि दिव्या यांचीही चित्रपटातील पहिली झलक समोर आली आहे.

‘धाकड’ या सिनेमात अर्जुन रामपाल खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्याचा या चित्रपटातील लुक नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. अर्जुनाचा हा लुक पाहिला तर तो अँग्री बॅडमॅन दिसत आहे. अर्जुनच्या संपूर्ण शरीरावर टॅटू दिसत असून, तो खूपच खतरनाक दिसत आहे. त्याने त्याचा लुक शेयर करताना लिहिले,” ‘शैतानाचे दुसरे नाव आहे रुद्रवीर, धाकड चित्रपट ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.” सोबतच त्याने लिहिले की, “या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. ही भूमिका एका वेळेस खतरनाक, घातक आणि कूल अशी दिसणार आहे.”

दुसरीकडे दिव्या दत्ताने देखील तिच्या या सिनेमातील लुकचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दिव्याचा हा लुक खूप धीर गंभीर आहे. सोबतच काहीशा बोल्ड लुकमध्ये दिसणारी दिव्या तितकीच स्ट्रॉंग देखील दिसत आहे. तिने तिच्या लुक शेयर करताना लिहिले की, “ही भीतीदायक दिसत असली तरी ती कुठल्या पातळीपर्यंत क्रूर आहे याचा अंदाज देखील लावला जावू शकत नाही. ही ‘धाकड’ मधील रोहिणी.”

तत्पूर्वी ‘धाकड’ हा सिनेमा ह्यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती.

हे पोस्टर शेयर करताना तिने लिहिले होते की, “ती निर्भय आणि उग्र आहे, ती एजंट अग्नी आहे. भारताचा पहिला महिला एक्शन थ्रिलर ‘धाकड’ १ ऑक्टोबर २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.”

 


Leave A Reply

Your email address will not be published.