Friday, December 8, 2023

‘रियल पुलिस ऑफ बॉलीवुड’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्याचा संघर्षमय जीवनाचा प्रवास, एकदा वाचाच

‘भागने की कोशिश मत करना। हमने तुम्हें चार तरफ से घर लिया है। भलाई इसी में है कि तुम अपने आप को कानून के हवाले कर दो।’…..हा डायलॉग आठवतोय का तुम्हाला? हा डायलॉग आजही तेवढाच लोकप्रिय आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हा डायलॉग कोणत्या अभिनेत्याचा आहे ते? या अभिनेत्याचे नाव आहे इफ्तेखार. ते 40 ते 90 च्या दशकातील अभिनेते होते. त्यांचा आवाज हा अजूनही सर्व चाहत्यांच्या स्मरणात आहे. त्यांनी चित्रपटात प्रामुख्याने पोलीसांच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे त्यांना रियल पोलिस ऑफ बॉलीवूड असेही म्हंटले जायचे. आज 4 मार्च त्यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेऊया…

22 फेब्रुवारी 1920 या दिवशी इफ्तेखार (Iftekhar) यांचा जन्म पंजाबमधील जालंधर या शहरात झाला होता. 40 ते 90 च्या दशकात त्यांनी राजेश खन्ना यांच्यापासून ते अमिताभ बच्चन याच्यांपर्यंत अभिनेत्यांसोबत काम केले आहे. बऱ्याच चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. पण त्यांनी एका चित्रपटात पोलिसाची भूमिका केली, त्यानंतर त्यांना त्याच भूमिका मिळत गेल्या. म्हणून त्यांना वेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याची संधी मिळाली नाही.

ते उत्तम अभिनेताच नाही, तर ते एक चांगले चित्रकार आणि गायकसुद्धा होते. त्यांना अभिनेता नाही तर गौअक्च व्हयाचे होते. पण योगायोगाने ते अभिनेते झाले. ज्यावेळेस ते चित्रपटात काम करत होते तेव्हा ते देशाची फाळणी झाली. त्यात त्त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानमध्ये निघून गेले, मात्र त्यांनी भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला.

फाळणीनंतर त्यांची भेट अभिनेते अशोक कुमार यांच्या सोबत झाली. अशोक कुमार यांच्या मदतीने त्यांना 1950 मध्ये ‘मुकद्दर’ या चित्रपटात काम मिळाले, त्यानंतर त्यांचा अभिनयाचा प्रवास कधीच थाबला नाही. इफ्तेखार यांचा शेवटचा काळ खुप वाईट गेला. कारण त्यांच्या मुलीचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यामुळे ते मानसिकरित्या खचले त्यामुळे त्यांचा 4 मार्च 1995 रोजी मृत्यू झाला. (bollywood-actor-iftekhar-death-anniversary-story-about-his-life)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! राग अनावर झाल्याने सलमान खानने ‘या’ दिग्दर्शकाच्या तोंडावर फेकून मारली डायरी, वाचा संपूर्ण प्रकरण?
अभिनयासह आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री श्रद्धा दास, जाणून घ्या बर्थडे गर्लच्या काही खास गोष्टी । HBD Shraddha Das

हे देखील वाचा