Saturday, December 7, 2024
Home नक्की वाचा धक्कादायक! राग अनावर झाल्याने सलमान खानने ‘या’ दिग्दर्शकाच्या तोंडावर फेकून मारली डायरी, वाचा संपूर्ण प्रकरण?

धक्कादायक! राग अनावर झाल्याने सलमान खानने ‘या’ दिग्दर्शकाच्या तोंडावर फेकून मारली डायरी, वाचा संपूर्ण प्रकरण?

विनोदी अभिनेता कपिल शर्मा याच्या शोमध्ये अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशासाठी येत असतात. तेव्हा कपिल शर्मा त्यांना त्यांच्या चित्रपटाविषयी, त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी प्रश्न विचारात असतो. तेव्हा प्रत्येक कलाकाराचे एकापेक्षा एक किस्से ऐकायला मिळतात. त्यातूनच प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी मिळते. असेच काहीसे घडले जेव्हा कपिल शर्माच्या शोमध्ये दिग्दर्शक साजिद नाडियादवाला पोहोचले. त्यांनी सलमान खान आणी त्यांच्यात एका चित्रपटावरून झालेल्या मजेदार किस्सा शेअर केला. चला तर बघूया अभिनेता सलमान आणि साजिद नाडियादवाला यांच्यातील तो मजेदार किस्सा….

कपिल शर्मच्या शो (kapil Sharma Show) मध्ये दिग्दर्शक साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala) आले तेव्हा त्यांनी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्यांचा मजेदार किस्सा सांगितला. साजिद यांनी सांगितले की, त्यांनी ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटासाठी त्यांनी सलमानला कास्ट केले होते. त्यामुळे या चित्रपटाचे शुटींग लवकरात लवकर सुरु करायचे होते. त्यामुळे त्यांनी सलमानशी संपर्क साधला पण, तो ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. साजिद यांनी सलमानला सांगितले की, मला या चित्रपटाचे शुटींग लवकरात लवकर सुरु करायचे आहे.’ त्यावर सलमान म्हणाला, ठीक आहे, तारीख घ्या, आपण 5 महिन्यांत शूटिंग सुरू करू.’

त्यानंतर साजिद म्हणाले की, मला शूटिंग लवकर सुरु करायचं आहे. सलमानने त्यांना शुटिंग कधी सुरू करायचे आहे असे विचारले, त्यावर ज्यावर दिग्दर्शकाने 20 दिवसांत शूटिंग सुरु करायचे असे सांगितले. त्यावर सलमान चिडून म्हणतो की, ‘तुम्ही वेडे झाले आहात का, मी आता चार चित्रपटांचे शुटींग करत आहे.’ असे म्हणत त्याने त्याची डायरी दिग्दर्शकाच्या तोंडावर फेकली आणि म्हणाला, ‘हे बघा इथे काही नाही’. त्यानंतर दिग्दर्शकाने ती डायरी त्यांच्याकडेच ठेवली. आणि शूटिंग तारखांचे नियोजन केले. काही दिवसांनी सलमान खानच्या घरातील एक व्यक्ती त्याला डायरी परत घेण्यासाठी आला. त्याने सांगितले की सलमानला डायरी हवी आहे. त्याला शूटिंगसाठी जायचे आहे, पण कुठे जायचे आहे ते कळत नाही. ही गोष्ट ऐकून सगळे जोरजोरात हसू लागले. (sajid nadiadwala share incident in kapil sharma show about har dil jo pyar karega movie salman and sajid fight shooitng dates)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार
देसी अंदाजमध्ये हरयाणवी क्वीन सपना चौधरीने केले लोकांना घायाळ, व्हिडिओ झाला व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा