Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

चार दिवसांपुर्वीच लग्न झालेली कियारा आहे प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या ‘या’ कृतीमुळे युजर्सने लावला अंदाज

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​चार दिवसांपूर्वीच राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये आपल्या प्रियजनांच्या उपस्थितीत लग्न बंधनात अडकले. या जोडप्याने त्यांच्या लग्नाशी संबंधित सर्व माहिती अत्यंत गुप्त ठेवली होती. मात्र, आता लग्नानंतर दोघेही उघडपणे पॅपराझींसमाेर एकत्र पोज देताना दिसले. यासाेबतच या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची घोषणाही केली. मात्र, अशातच आता कियारा एका व्हिडिओमुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये कियारा तिच्या शालने पोट लपवत असून हे पोट लपवणे तिला महागात पडले आहे.

कियारा (kiara advani) हिला कॅमेऱ्यासमोर पोट लपवताना पाहून युजर्सनी आलिया भट्टप्रमाणे कियाराही लग्नाआधीच प्रेग्नंट झाली का? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. कियारा आणि सिद्धार्थ 7 फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकले. कियाराच्या लग्नाला चार दिवसही उलटले नाहीत आणि अशात आता तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा माेठ्या प्रमाणात हाेऊ लागली आहे. हा व्हिडिओ जैसलमेर विमानतळाचा आहे, जिथे कियारा शालने पोट झाकताना दिसली. कियाराचा हा व्हिडिओ पाहून युजर्स तिला प्रेग्नंट म्हणू लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियाराच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “मला खात्री आहे की, तिच्या प्रेग्नेंसीची बातमी 2-3 महिन्यांत येणार आहे. ती कुठेही गेली तरी पोट लपवून ठेवते. आपल्याला ते मुर्खात काढते.”, तर दुसर्‍याने लिहिले,”आलियाप्रमाणेच ती देखील प्रेग्नंट आहे.” आलिया भट्टने लग्नाच्या 1-2 महिन्यांनंतरच तिच्या प्रेग्नेंसीची माहिती चाहत्यांशी शेअर केली होती, तर 2022मध्ये तिने लेक ‘राहा’ हिचे या जगात स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

माध्यमातील वृत्तांनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिल्लीत त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.(bollywood actress kiara advani seems pregnant like alia bhatt before marriage actress brutally troll for covering belly with shawl video viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्री असूनही पीके रोझी यांनी ‘या’ कारणामुळे काढले त्यांचे संपूर्ण आयुष्य अज्ञानात

मराठी विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल स्वप्निल जोशी स्पष्टच म्हणाला, ‘मराठी चित्रपटांना स्क्रीनिंग मिळणं हाच…’

हे देखील वाचा