Friday, December 8, 2023

‘आदिपुरुष’साठी क्रिती सेनाॅन नव्हती पहिली पसंती? ‘या’ तिन्ही अभिनेत्रींनी नाकारली होती ‘जानकी’ची भूमिका

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष‘ हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सर्वत्र जोरात सुरू आहे. चित्रपटात प्रभासने रामची भूमिका साकारली आहे, तर क्रिती सेनाॅनने सीतेची भूमिका साकारली आहे. अशात सीताच्या लूकमध्ये क्रितीला खूप पसंती दिली जात आहे. मात्र, असे असेल तरी ‘जानकी’च्या भूमिकेसाठी क्रिती निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती हे तुम्हाला माहीत आहे का? काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

होय, सीतेच्या भूमिकेसाठी क्रिती सेनॉन (kriti sanon) ही निर्मात्याची पहिली पसंती नव्हती. माध्यमातील वृत्तानुसार, निर्मात्यांनी क्रितीच्या आधी तीन अभिनेत्रींना सीतेची भूमिका ऑफर केली होती, परंतु त्यांनी हा चित्रपट नाकारला. यामध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी पहिली पंसत हाेती अनुष्का शर्मा. माध्यमातील वृत्तानुसार, अनुष्का ‘आदिपुरुष’मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार होती. अनुष्काने ओम राऊत यांची भेटही घेतली होती, पण काहीही निष्पन्न झाले नाही. अशात आता अनुष्का ‘झिरो’नंतर ‘चकडा एक्सप्रेस’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्का शर्माने नकार दिल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि कीर्ती सुरेश यांनाही प्रभाससोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. अनुष्का शेट्टीने यापूर्वी ‘बाहुबली’मध्ये प्रभाससोबत काम केले आहे, त्यामुळे तिला सीतेच्या भूमिकेत पाहणे मनोरंजक ठरले असते, परंतु तसे झाले नाही. अशात अनुष्का शेट्टीनंतर सीतेच्या भूमिकेसाठी कीर्ती सुरेशचे नाव चर्चेत होते.

माध्यमातील वृत्तानुसार, कीर्ती सुरेशने ‘आदिपुरुष’साठी होकार दिला होता आणि ती कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी करणार होती, पण शेवटच्या क्षणी कीर्तीने रजनीकांतच्या चित्रपटामुळे ही ऑफर नाकारली. अशात कीर्तीच्या सीता बनण्याच्या अफवाही धूसर झाल्या आणि त्यानंतर या भूमिकेसाठी क्रिती सेनॉनला फायनल करण्यात आले.(bollywood actress kriti sanon was not first choice for makers anushka sharma anushka shetty keethi suresh rejected janki role as per report)

अधिक वाचा-
‘मैं निकला गड्डी लेके’वर सनी देओलने लावले ठुमके, व्हिडिओ नाही पाहिला तर मग काय पाहिलं?

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलला होणार अटक?, रांची कोर्टाने वॉरंट केले जारी

हे देखील वाचा