Friday, December 8, 2023

आदिपुरुषची ‘जानकी’ सार्वजनिक ठिकाणी करत होती स्मोकिंग, क्रिती सेनाॅने सांगितला ‘तो’ किस्सा

आदिपुरुष‘ हा बहुचर्चित चित्रपट अखेर शुक्रवारी (16 जून) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटातला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रभास आणि क्रिती सेनाॅनचा हा चित्रपट सध्या सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरच्या बाहेर प्रचंड गर्दी केली होती. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटावर अक्षेप घेण्यात आले होते.

आदिपुरुष’च्या (Adipurush) व्हीएफएक्सवर तर कधी स्टार्सच्या लूकवरून वाद निर्माण झाला होता. याशिवाय चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि जानकीची भूमिका साकारणाऱ्या कृती सेनाॅन यांच्या मंदिर परिसरातील गुड बाय किसिंग सिनमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यांनतर हे प्रकरण चांगलच गाजले. त्यामुळे क्रिती (Kriti Senan) प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘आदिपुरुष‘च्या या जानकीने एकदा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढली होती. त्‍यावेळी आलेला स्‍वत:चा अनुभवही तिने शेअर केला आहे.

त्यानंतर क्रितीला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. याबद्दल एकदा माध्यमांशी बोलताना क्रितीने सांगितले की, “मी धूम्रपान करत नाही. पण चित्रपटासाठी मला धूम्रपान करावे लागले. मला स्मोकिंग करायला अजिबात आवडत नाही. मी हे चित्रपटासाठी केले होते. मी स्मोकिंग यासाठी केल की, जे स्मोकिंग करतात त्यांना मी स्मोकिंग करत नाही, ही गोष्ट खोटी आहे हे लगेच समजली असती, म्हणून मी स्मोकिंग केले, असे तिने सांगितले.

‘आदिपुरुष’मध्ये आपल्या साधेपणाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या क्रितीने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव स्टारर ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात तिने बिंदास बाला बिट्टीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात क्रिती सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसली होती. तिचा हा अवतार पाहून चाहतेही थक्क झाले होते. खऱ्या आयुष्यातही क्रितीला सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे, असे काहींना वाटू लागले होते. (Adipurush fame actress Kriti Senan once smoked a cigarette)

अधिक वाचा- 
हृतिक रोशनच्या ‘या’ चित्रपटात कियारा अडवानीची एन्ट्री, ज्युनियरसोबत करणार स्क्रीन शेअर
आता सुट्टी नाही! पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरूष’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप

हे देखील वाचा