Sunday, December 3, 2023

‘आदिपुरुष’ला नाव ठेवण आलं अंगलोट; प्रभासच्या चाहत्यांनी व्यक्तीला केली बेदम मारहाण

लोकप्रिय अभिनेता प्रभास मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा पडद्यावर झळकला आहे. त्यामुळे प्रभासला पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रभासचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचा ‘आदिपुरुष’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट शुक्रवारी (16 जून ) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना खूप गर्दी केली आहे. प्रभास हा चित्रपट चांगलाच धुमाकुळ घालत आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपच प्रदर्शित होण्यापुर्वी या चित्रपटावर अनेकांनी अक्षेप घेतले. नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या एका व्यक्तीला प्रभासच्या चाहत्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणाला की, “‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी या चित्रपट प्ले स्टेशन गेममधील सगळे राक्षस टाकले आहेत अस वाटत आहे. त्यामध्ये हनुमान,आणि काही 3D शॉट्सशिवाय दुसर काहीच नाही. तर अभिनेता प्रभास ‘श्रीरामांच्या भूमिकेत अजिबात शोभत नाही. बाहुबलीमधील त्याचा लूक प्रचंड सुंदर होता. पण या चित्रपटात त्याला अजिबात चांगला लूक दिलेला नाही.” (On Adipurush’
Prabhas fans brutally beat up a person who gave negative feedback)

हे सर्व बोलण प्रभासच्या चाहत्यांनी ऐकल आणि त्या वक्तीला मारहाण सुरू केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप साऱ्या कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “इतक खरं नव्हतं बोलायचं.” दुसऱ्याने लिहिले की,”रामाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे चाहते, रावणाच्या भक्तांसारखे वागतात.” तसेच काही लोकांनी मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

अधिक वाचा-
‘इमली’ने वडिलांच्या लग्नात लावली हाताला मेहंदी; जाणून घ्या अभिनेत्रीची हाेणारी आई आहे तरी काेण?
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं ‘आदिपुरुष’मध्ये साकारली शूर्पणखाची भूमिका; म्हणाली… 

हे देखील वाचा