बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हॉट लूक्स आणि स्टनिंग लूकसाठी ओळखली जाते. मलायका ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच, ती अनेकदा पॅपराझींच्या कॅमेऱ्यात कैद होते. अशात आता ही अभिनेत्री नुकतीच पुन्हा एकदा पॅपराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिथे ती 3 लाख रुपये किमतीचा हुडी परिधान करुन दिसत आहे. मात्र, लोक तिच्या स्टायलिश हुडीची 600 रुपयांच्या रेनकोटशी तुलना करत आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…
अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) सोमवारी (10 जुलै)ला ब्लॅक अँड व्हाइट हुडीमध्ये स्पाॅट झाली होती. मलायकाने सोबत व्हाइट स्नीकर्स घातले होते. तसेच, तिने सनग्लासेससह आपला लूक पूर्ण केला. अशात आता सोशल मीडियावर मलायकाच्या हुडीची लोक खिल्ली उडवत आहेत.
मलायकाच्या ओव्हरसाईज ड्रेसमध्ये लांब बाही आहे आणि यासाेबत मोनोग्राम लोगो आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, हे लेबल ख्रिश्चन डायरचे आहे, ज्याची किंमत जाणून सगळेच थक्क झाले. या ड्रेसची किंमत 3,32,861 रुपये आहे.
View this post on Instagram
मलायकाच्या या हुडीची तुलना सोशल मीडिया युजर्स रेनकाेटसाेबत करत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘इतकं महाग काय घ्यायचं की, बाॅटम घ्यायला पैसेच उरणार नाही.’, तर दुसर्या यूजरने लिहिले की, ‘सॅमला असा रेनकोट 500 रुपयांमध्ये मिळेल’. अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘तरी सुद्धा चांगला दिसत नाही आहे’ एका इंस्टा युजरने ‘इतक्यात कुणीतरी लग्न करेल’ अशीही कमेंट केली आहे.(bollywood actress malaika arora set monsoon fashion in oversized hoodie worth rs 3 lakh )
अधिक वाचा-
–अरे बापरे! अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नवऱ्यासमोर उच्चारला होता ‘तो’ अपशब्द; म्हणाल्या….
–सिद्धार्थ जाधव सारखा दिसणारा ‘हा’ माणुस तुम्ही पाहायलाय का? पाहा फोटो