Tuesday, September 26, 2023

सिद्धार्थ जाधव सारखा दिसणारा ‘हा’ माणुस तुम्ही पाहायलाय का? पाहा फोटो

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव होय. सिद्धार्थला चाहते त्याला सिद्धू या नावाने ओळखतात. आपल्या विनोदी भूमिकाने त्याने स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. सिद्धूचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याने मराठी चित्रपट सृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लोक त्याच्या कामाचे सतत कौतुक करताना दिसतात.

सिद्धूने (Siddharth Jadhav) लुक्सपेक्षा अधिक प्रतिभेच्या जोरावर यश मिळवता येते हे सिद्ध करून दाखवले आहे. मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याने या क्षेत्रात यश मिळवले आहे. त्याचा संघर्ष सगळ्यांसाठीच एक प्रेरणा आहे. सिद्धार्थचे लाखो फॅन आहे. सोशल मीडियावरही त्याची प्रचंड क्रेझ नेहमीच दिसून येते. तो देखील त्याच्या फॅन्ससाठी विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. त्याच्या पोस्टवर चाहते भरभरून प्रमाचा वर्षाव करत असतात.

सिद्धार्थ जेवढा वेळ कामाला देतो, तेवढाच वेळ तो नेहमीच त्याच्या कुटुंबाला सर्व व्यक्तींना देतो. सिद्धार्थ सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सिद्धार्थने नुकताच एक फोटो शेअर केली आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ आणि त्याच्या भाऊ दिसत आहे. हा फोटो पाहून चाहते चक्कीत झाले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये सिद्धार्थचा मोठा भाऊ डॉ. लवेश जाधव दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सिद्धार्थ आणि त्याचा मोठा भाऊ सेम टू सेम एकमेकांसारखे दिसतात. त्या दोघांचीही हेअरस्टाईलही सारखीच आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, “बडे मिया, छोटे मिया, डॉ. लवेश, माझा भाऊ”. तसेत सिद्धार्थने लवेश हे माझे प्रेरणास्थान असल्याचेही सांगितले आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर काॅमेडी क्विन भारती सिंगने कमेंट केली आहे. तिने लिहिले की, ‘दादा’. तर अभिनेता उत्कर्ष शिंदेने ‘तुला सर्व काही मिळू दे’, अशी कमेंट केली आहे. (Marathi actor Siddharth Jadhav’s photo is viral on social media)

अधिक वाचा- 
“कुटुंब नाही, मला इच्छामरण सुद्धा चालेल पण…” काम नसल्याने मराठी अभिनेत्याने कोकण हार्टेड गर्लकडे मांडली व्यथा
मिताली मयेकरचा थायलंडमध्ये सफरनामा

हे देखील वाचा