Monday, April 15, 2024

“एकेकाळी केला हाेता ट्रेनमधून उडी मारण्याचा विचार, पण… “, संघर्षाचे दिवस आठवून मृणाल ठाकूर भावूक

हिंदी चित्रपटांबरोबरच दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही आपले स्थान निर्माण करणारी मृणाल ठाकूर ‘गुमराह’ चित्रपटात अगदी वेगळ्या अंदाजात दिसली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. मृणाल ठाकूरशिवाय या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि रोनित रॉय यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी दाद दिली. अशात अलीकडेच, मृणालने तिचे संघर्षमय दिवस आठवले आणि सांगितले की, तिला चित्रपटांमध्ये काम मिळत नसताना तिच्या मनात कसे चुकीचे विचार येत हाेते.

मृणाल (mrunal thakur) हिने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती करिअर करण्यासाठी मुंबईत आली होती आणि खूप दिवसांपासून काम शोधत होती. या प्रवासात एकटीच राहिल्याने तिने स्वतःचा जीव घेण्याचाही अनेकदा विचार केला. कारण, ती खूप तुटलेली होती आणि तिच्यात इच्छाशक्ती उरली नव्हती. अशात रिकाम्या हाताने तिला घरी देखील जायचे नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

मृणालने पुढे सांगितले की, “मला वाटायचे की, जर मी चांगले काम करू शकत नाही, तर मी आयुष्यात काहीही करू शकत नाही. वयाच्या 23व्या वर्षी लग्न करेन असं वाटलं होतं, पण त्यानंतर मूल होईल आणि मला तसे करायचे नव्हते.” मृणाल पुढे म्हणाली, “मी लोकल ट्रेनने प्रवास करायचे. मी कितीतरी वेळा ट्रेनच्या दरवाज्यासमोर उभा राहायचे. कधी कधी वाटायचं की. मी ट्रेनमधून उडी मारेन.”

मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर मृणाल अलीकडेच आदित्य रॉय कपूरसोबत ‘गुमराह’ या चित्रपटात दिसली. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री ‘पिप्पा’, ‘पूजा मेरी जान’ आणि ‘आंख मिचोली’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मृणालचा बॉलीवूड तसेच टालिवूडमध्येही माेठा चाहता वर्ग आहे. ( bollywood actress mrunal thakur shares her struggle experience and says i want to die by jumping from the train)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली इशिता दत्ता, फाेटाे व्हायरल
सीता नवमीच्या दिवशी आदिपुरुषमधील ‘जानकी’चा लूक समोर, अश्रुंमधून वेदना वक्त करणाऱ्या क्रितीने वेधले लक्ष

हे देखील वाचा