Tuesday, May 28, 2024

धक्कादायक! अभिनेत्री नीना गुप्ता यांची प्रकृती खालावली, चाहत्यांनी लवकर बरे हाेण्यासाठी केली प्रार्थना

अभिनेत्री नीना गुप्ता सध्या ‘उंचाई‘ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. मात्र, अशातच नीना हिच्या दातांमध्ये काही समस्या होती, ज्यासाठी ती तिची मैत्रिणी आणि डॉ. शालिनी प्रधान यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली होती. तेव्हाचा एक व्हिडिओ नीनाने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ बघून नीनाच्या चाहत्यांनी तिच्या मजेदार शैलीचे कौतुक करण्यास सुरुवात केली आणि तिला लवकर बरे होण्यासाठी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. नीनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नीना गुप्ता (Neena Gupta) हिने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डेंटल क्लिनिकमध्ये हॉस्पिटलच्या खुर्चीवर पडलेली दिसत आहे. तिच्यासाेबत डॉक्टरही उपस्थित आहेत. व्हिडीओमध्ये नीना हसत हसत सांगत आहे की, “इकडे बघ माझी काय अवस्था आहे.” मग हसत हसत डॉक्टरांचा हात धरून ती म्हणते की, “ती माझी मैत्रिण आहे..खूप चांगली मैत्रीण आहे..ती खूप छान इंजेक्शन देते.” असं म्हणत असताना नीनासोबत डॉक्टरही हसायला लागते. हा व्हिडिओ शेअर करताना नीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माय डिअर डेटिंस्ट फ्रेंड शालिनी प्रधान”

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

या व्हिडिओवर नीना गुप्ताचे चाहते तिच्या साधेपणाचे आणि सौंदर्याचे जोरदार प्रशंसा करत आहेत आणि तिचे नैसर्गिक सौंदर्यचेही काैतूक करत आहेत. यासाेबतच अनेकजण तिला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. एक मजेशीर कमेंट करताना एका युजर्सने लिहिले की, “टीनाचा चित्रपट बातों बातों में नंतर, नीनाचा चित्रपट दातों-दाताें में.” टीना मुनीम आणि अमोल पालेकर यांचा हा चित्रपट 1979 मध्ये प्रदर्शित झाला होता.

नीना गुप्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अलीकडेच सूरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात नीनासोबत अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका, डॅनी डेन्झोंगपा आणि परिणीती चोप्रा आहेत. (bollywood actress neena gupta shares her dental treatment video fans praise and funny comments)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
पंकज त्रिपाठी साकारणार अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका, जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार चित्रपट

उर्फी जावेद झाली टॉपलेस, शक्कल लढवत मोबाईल-चार्जरपासून बनवली बिकिनी

हे देखील वाचा