Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘विचार करून प्रेम हाेत…’ म्हणत पलक तिवारीने इब्राहिमसाेबतच्या नात्यावर केला खुलासा

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. पलक लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटात दिसणार आहे. पलक गायक हार्डी संधूसोबतच्या ‘बिजली बिजली’ या पहिल्या म्युझिक व्हिडिओपासून प्रसिद्धीच्या झोतात आली. अशात चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी ही अभिनेत्री सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याच्या बातम्यांमुळेही चर्चेत आली होती.

पलक (palak tiwari) आणि इब्राहिम (ibrahim ali khan) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही एका कारमध्ये एकत्र दिसले होते. अशात पॅपाराझींने तिच्याकडे पाहताच अभिनेत्रीने तिचा चेहरा लपवायला सुरुवात केली. यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना वेग आला, ज्यानंतर एका मुलाखतीत पलकने स्पष्ट केले की, “ती आणि इब्राहिम आणखी काही मित्रांसोबत होते.” अशात तिला पॅपराझींना टाळण्याचा प्रयत्न का केला असे विचारले असता ती म्हणाली, “मी लपत हाेते. कराण, मी माझ्या आईला आम्ही काेणत्या ठिकाणी जाताेय याबाबत खाेटे सांगितले हाेते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

अशात आता एक वर्षानंतर पलकने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इब्राहिमसोबतच्या तिच्या डेटींगच्या बातम्यांबद्दल सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना पलक म्हणाली, “दोन चित्रपटांच्या शूटिंगमुळे मी आयुष्यात खूप व्यस्त आणि आनंदी  आहे. मला फक्त माझ्या कामावरच लक्ष केंद्रित करायचे आहे आणि हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

अफवांबद्दल बोलताना पलक पुढे म्हणाली, “मी अफवांवर लक्ष देत नाही. त्याऐवजी मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायला आवडते. प्रेम कधी विचारपुर्वक केले जात नाही. ना त्याची भविष्यवाणी केली जाते. सध्याच्या परिस्थितीत माझ्यासाठी माझे काम खूप महत्वाचे आहे. व्यावसायिकदृष्ट्या हा माझ्यासाठी खूप महत्वाचा काळ आहे आणि मला माझी एनर्जी त्यावर केंद्रीत करायची आहे.” असे पलक हिने मुलाकतीदरम्यान सांगितले.(bollywood actress palak tiwari breaks silence on dating rumours with ibrahim ali khan )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY: विक्रांत मैसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्ही शोमध्ये निभावल्या आहेत मनोरंजक भूमिका
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

हे देखील वाचा