Tuesday, May 21, 2024

‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटाने साजरा केला मुलगा जय आणि मुलगी जियाचा पहिला वाढदिवस, पाहा फाेटाे

बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा हिने 18 नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसीद्वारे पती जीन गुडइनफसह जुळ्या मुलांचे स्वागत केले. जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. आज जय-जिया एक वर्षाची झाली. अशा परिस्थितीत प्रितीने तिच्या मुलांसाेबत आणि मुलीसोबत एक सुपर क्यूट पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केला आणि या फोटोंसह त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रिती झिंटा (Preity Zinta) हिने तिच्या इन्स्टाग्रामवर दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून आपल्या मुलांसाठी एक नाेट लिहिलं आहे. प्रीतीने मुलगी जियासोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की,”मला नेहमीच माहित होते की, मला तू हवी आहेस… मी तुझ्यासाठी प्रार्थना केली, मी तुझ्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आता तू येथे आहेस याला एक वर्ष झाले. माझे हृदय भरले आहे आणि तुझ्या मौल्यवान स्मितहास्यांसाठी, तुझ्या प्रेमळ मिठीसाठी आणि माझ्या उपस्थितीसाठी मी सदैव ऋणी राहीन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

तिने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “माझ्या छोट्या बाहुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला ज्याची अपेक्षा होती ते तुम्हीच आहात. तुमचे जीवन नेहमी प्रेम आणि आनंदाने भरलेले जावो. मी तुझ्यावर चंद्र इतके प्रेम करते. प्रत्येक दिवस जसजसा जातो तसतसे माझे तुझ्यावरचे प्रेम वाढत जाते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

दुसऱ्या पोस्टमध्ये तिने तिच्या मुलाचा एक अतिशय क्यूट फोटो शेअर केला आहे. तिच्या मुलाचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आयुष्यात मी साकारलेल्या सर्व भूमिकांपैकी सर्वात जवळची आईची भूमिका आहे. मला खात्री आहे की, आम्ही एकमेकांना अनेक आयुष्यांपासून ओळखतो. मी विचार करत होते की, आपण एकमेकांवर किती प्रेम करू आणि तुला असे चमकताना पाहून माझे मन किती भरून येईल. मी दररोज तुझ्यावर अधिक प्रेम करीन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय. तुमचे जीवन आज आणि सदैव आनंदाने भरले जावो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जय.”

प्रीती झिंटा हिच्या काराकीर्द विषयी बाेलायचे झाले तर, तिने ‘कल हाे ना हाे’, ‘दिल है तुम्हाला’, ‘दिल से’, ‘हर दिल जाे प्यार करेगा’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.(bollywood Actress preity zinta celebrates gia and jai first birthday and share pics)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ब्रेथ: इनटू द शॅडोज’च्या टीकेवर अभिषेकने तोडले मौन; म्हणाला,’मानसिक आरोग्याबाबत आम्ही…’

झगा मगा अन् मला बघा, जान्हवीला फॅशन पडली चांगलीच महागात

हे देखील वाचा