×

आई झाल्यानंतर प्रीती झिंटाचे आयुष्य कसे बदलले ते सांगत डिंपल गर्लने शेअर केला तिच्या मुलांचा फोटो

बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रीती झिंटा मागच्यावर्षी आई झाली. प्रीती झिंटा आणि जीन गुडइनफ हे पती पत्नी मागच्यावर्षी सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाचे आणि मुलीचे आईबाबा झाले आहेत. तिने स्वतः याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. आज (८ एप्रिल) मदर्स डेच्या निमित्ताने तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या दोन्ही मुलांची झलक दाखवली आहे. प्रितीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात ती तिच्या आईसोबत मुलांना घेऊन पोज देत आहे. यासोबत तिने एक लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे.

प्रिती झिंटाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “मला कधीच समजले नाही की माझ्या आईने मला नेहमीच का बोलावले, सतत माझ्याबद्दल चिंतेत का असायची आणि मी कुठे याबद्दल तिला नेहमीच का जाणून घ्यायचे असायचे. मी एक टिन्जर्स होती आणि तरुण होते तेव्हा जग पहिले मात्र तोपर्यंत मी आई नव्हती झाली. मात्र आता मी या गोष्टीचा सुरुवातीपासूनच विचार करत आहे. स्वतःच्या आधी मी माझ्या मुलांचा विचार करते. मी आता हे समजून घेते आहे की, मातृत्व काय आहे. हे खूपच सुंदर, सशक्त आणि थोडे घाबरावणरे आहे.”

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

पुढे प्रीती लिहिते, “आशा करते की माझे मुलं माझ्याबद्दल अधिक संवेदनशील आणि कौतुक करणारे असतील. जेवढे मी माझ्या आईसाठी करते. जी काही परिस्थिती असेल मी माझ्या मुलांवर नेहमीच प्रेम करत राहील आणि सर्व आयांसारखी आशा ठेवणे शिकेल. मी ते सर्व करेल जे मी करू शकते. कारण मला ते मोठे होऊन सर्वश्रेष्ठ झाले पाहिजे. सर्वानाच हॅप्पी मदर्स डे कायमच सर्वाना खूप प्रेम आणि भरपूर प्रकाश.” या पोस्टसोबत प्रितीने जरी तिच्या मुलांचा फोटो शेअर केला असला तरी त्यांचा स्पष्ट चेहरा यात दिसत नाही. सध्या प्रीती बॉलिवूडपासून लांब असली तरी तिने लवकरच चित्रपटांमध्ये सक्रिय व्हावे अशीच तिच्या फॅन्सची इच्छा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post