‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिचा सध्या हॉलिवूड चित्रपटसृष्टीत बोलबाला आहे. अलीकडेच तिची ‘सिटाडेल‘ ही वेबसिरीज रिलीज झाली असून या सीरीजमध्ये प्रियांका शानदार अॅक्शन अवतारात दिसत आहे. तर दुसरीकडे, अभिनेत्री बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल सतत आपले मत व्यक्त करत आहे. दरम्यान, आता देसी गर्लचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करण जोहरने प्रियांकाला तिच्या लग्नाला आमंत्रित न करण्याविषयी विचारले आहे.
व्हायरल व्हिडिओ ‘कॉफी विथ करण’ या शोचा आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि करीना एकत्र बसलेल्या दिसत आहे. खरेतर लग्नानंतर प्रियांका पहिल्यांदाच करण जोहरच्या शोमध्ये आली हाेती. अशात करण प्रियांकाला लग्नाबद्दल प्रश्न विचारतो आणि उत्तरात प्रियांका म्हणते, “आमचे लग्न खूप मजेदार होते. कारण, त्यात फक्त कुंटुंब हाेते त्याचे आणि माझे.”
View this post on Instagram
यानंतर करण जोहरने प्रियांकाला बॉलीवूडमधील कोणालाही आमंत्रित न केल्याबद्दल विचारले. यावर प्रियांका म्हणाली, ‘मलाही तुमच्या अनेक फंक्शन्समध्ये बोलावण्यात आले नव्हते’ प्रियांकाचे हे उत्तर ऐकून करणची बाेलतीच बंद झाली अन् ताे बाेलता बाेलता थांबून गेला.
View this post on Instagram
अलीकडेच प्रियांका चोप्रा एक दिवसासाठी भारतात आली होती. कारण, बहीण आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डासोबत साखरपुडा हाेता. अशा परिस्थितीत प्रियांकाने तिच्या लहान बहिणीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.
View this post on Instagram
प्रियांका चाेप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर प्रियांका अखेरची हॉलिवूड फिल्म ‘लव्ह अगेन’मध्ये दिसली होती. अशात आता अभिनेत्री लवकरच दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासाेबत आलिया भट्ट आणि कॅटरिना कॅफ देखील मुख्य भूमिकेत आहे. (bollywood actress priyanka chopra didnt invite karan johar for her wedding video viral )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘प्रत्येक दिवस मधुचंद्रासारखा आहे’, वैवाहिक जीवनाबद्दल काय बोलली दलजीत कौर? एकदा वाचाच
सुंबुलवर काेसळला दु:खाचा डाेंगर; अभिनेत्री हंबरडा फाेडत म्हणाली, ‘तू नेहमी माझ्या हृदयात राहशील’