Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा ‘पावरी हो रही है’वर ‘योगा ट्विस्ट’, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल, याबद्दल काहीही सांगता येत नाही. काही दिवसांपासून पाकिस्तानमधील एका मुलीचा ‘पावरी हो रही है’ व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर आतापर्यत अनेक मराठी तसेच हिंदी कलाकारांनी व्हिडिओ बनवले आहेत. यामध्ये आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या नावाचाही समावेश झाला आहे. तिने ‘पावरी हो रही है’चा आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. इतर कलाकारांप्रमाणे तिने केवळ व्हिडिओ तयारच केला नाही, तर यामध्ये एक भन्नाट ट्विस्टही दिला आहे. तिचा हा व्हिडिओ वाऱ्याप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरं तर रकुल प्रीतने या व्हिडिओमध्ये योगाचा ट्विस्ट दिलेला पाहायला मिळत आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत योगा प्रशिक्षकेला टॅग करत तिने “यह मैं हूं… यह अंशुका है और यह यमाटो पावरी हो रही है,” अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. सोबतच तिने पुढे लिहिले की, “आणि अशाप्रकारे आम्ही पावरी करत आहोत.”

या व्हिडिओत तिच्यासोबत तिची योगा प्रशिक्षक अंशुकाही योगा करताना दिसत आहे. तिने या व्हिडिओला यशराज मुखाटे यांचे रिमिक्स गाणे दिले आहे.

रकुल प्रीत लवकरच अभिनेता आयुषमान खुरानासोबत एका चित्रपटात झळकणार आहे. याव्यतिरिक्त अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘मे डे’मध्ये ती झळकणार आहे.

रकुल प्रीत यापूर्वी कोरोना व्हायरस संक्रमित झाली होती. त्यानंतर तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. कोरोना व्हायरसमधून ठीक झाल्यानंतर ती मालदीवला सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेली होती.

रकुल प्रीतने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचाही समावेश आहे. यामध्ये तिने अनेक महत्त्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिचे चित्रपट चाहत्यांना खूप भावतात. सोबतच तिने अजय देवगणसोबतही काम केले आहे.

तिने सन २०१४ मध्ये ‘यारियां’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये ‘दे दे प्यार दे’, ‘मरजावां’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा! बॉलिवूड कपल रणबीर- आलिया करणार होते सर्वांसमोर ‘लिप- लॉक’, पाहा त्यांचा रोमँटिक व्हिडिओ

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ

हे देखील वाचा