आहा! बॉलिवूड कपल रणबीर- आलिया करणार होते सर्वांसमोर ‘लिप- लॉक’, पाहा त्यांचा रोमँटिक व्हिडिओ

Bollywood Couple Ranbir Kapoor Alia Bhatt Throwback Lip Lock Video Viral From Awards Show Watch


बॉलिवूडमध्ये अजय- काजोलपासून ते रणवीर- दीपिकापर्यंत अनेक सुंदर जोडपे आपल्याला पाहायला मिळतात. यांमधील काहींचे लग्न झाले आहे, तर काहीजण लवकरच लग्नबंधनात अडकण्याच्या मार्गावर आहेत. यातीलच एक क्युट जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट होय. हे दोघेही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतात. या दोघांना सोबत पाहून चाहतेही आनंदी होतात. विशेष म्हणजेच या जोडीला केवळ ऑनस्क्रीनच नाही, तर ऑफस्क्रीनही एकत्र पाहायला चाहत्यांना आवडते. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत असतात. अशातच आता त्यांचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून भन्नाट अशा प्रतिक्रिया येत आहेत.

खरं तर रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा थ्रोबॅक व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एका पुरस्कार सोहळ्यात रणबीर आणि आलिया दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रणबीर आणि आलियाला एकमेकांंना चुकून किस करण्याचा प्रयत्न करत असतानाच थांबतात.

दोघांचाही हा व्हिडिओ सन २०१९ साली झालेल्या झी सिने अवॉर्डचा आहे. या जोडप्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडत आहे. यावर्षी रणबीर कपूरला ‘संजू’  या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दुसरीकडे आलियाने या पुरस्काराची घोषणा केली होती.

रणबीर कपूरच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने सन २००७ साली संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘सांवरिया’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्याने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. त्यामध्ये ‘तमाशा’, ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दुसरीकडे आलिया भट्टच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २०१२ साली करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. यानंतर तिनेही अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. यामध्ये ‘राझी’, ‘उडता पंजाब’, ‘हायवे’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

या दोघांच्याही आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर ते दोघेही लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटातून ते पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याची घोषणा सन २०१८ मध्ये केली होती. या चित्रपटात रणबीर-आलिया व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन आणि डिंपल कपाडिया यांसारखी दिग्गज मंडळींचा समावेश आहे.

त्याचबरोबर या चित्रपटाची रिलीझ डेट हेवी वीएफएक्समुळे नेहमीच बदलत आहे. दुसरीकडे आलिया सध्या आपल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामुळेही भलतीच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेल नुकताच रिलीझ झाला आहे. ट्रेलरची जोरदार प्रशंसा केली जात आहे. तसेच आलिया भट्टच्या अभिनयला अनेक चाहते पसंत करत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.