Monday, February 26, 2024

काय सांगता! ‘या’ कारणामुळे रति अग्निहाेत्रीनं सहन केला 30 वर्ष पतीचा अत्याचार

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींनी आपल्या कामाचा डंका वाजवला आहे. या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रती अग्निहोत्री. हिंदी, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रती अग्निहोत्रीने बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे आणि त्यांच्या कामाचे लोकांकडून खूप कौतुक झाले आहे. रती अग्निहोत्रीची बहुतेक अभिनेत्यांसोबतची जोडी चित्रपटाच्या पडद्यावर हिट ठरली, पण चित्रपटाच्या पडद्यापासून दूर राहून तिच्या खऱ्या आयुष्यात आलेली व्यक्ती हीरो नव्हे तर खलनायक ठरला आणि या अभिनेत्रीने तब्बल 30 वर्षे पतीचा अत्याचार सहन केला. त्यामागे एक मोठे कारण होते, ज्याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे. 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रती अग्निहोत्री आज त्यांचा 62 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील कटू सत्य.

अभिनेत्री रती अग्निहोत्री (rati agnihotri) यांचा जन्म 10 डिसेंबर 1960 रोजी बरेली, यूपीमध्ये झाला. अभिनेत्रीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. रती 16 वर्षांच्या झाल्यावर आपल्या कुटुंबासह चेन्नईला शिफ्ट झाल्या. इथल्या शाळेत शिकत असताना त्या अभिनय करायच्या. त्याचवेळी तामिळचे प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा आपल्या नवीन चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. एकदा भारती राजाने रती यांना शाळेतील नाटकात काम करताना पाहिले आणि वडिलांकडे त्यांची संमती मागायला गेले. यावर रतीच्या वडिलांनी तिला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली. यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी रती यांनी ‘पुडिया वरपुकल’ या पहिल्या चित्रपटात काम केले. 1979 मध्ये आलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

चित्रपटाच्या यशानंतर त्यांना आणखी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यादरम्यान त्यांनी अवघ्या तीन वर्षांत 32 कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. रतीने साऊथचे सुपरस्टार रजनीकांत, कमल हासन आणि चिरंजीवी यांच्यासोबतही काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे सुपरस्टार समजले जाणारे कमल हासनसोबत त्यांची जोडी चांगलीच हिट झाली होती. साऊथमध्ये नाव कमावल्यानंतर रती अग्निहोत्रीने 1981 मध्ये आलेल्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. येथेही त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली आणि पदार्पणाच्या चार वर्षांनी 1985 मध्ये बिझनेसमन अनिल विरवानीसोबत लग्न केले. यावेळी रती अग्निहोत्रीची कारकीर्द शिखरावर होती. लग्नानंतर पतीने रतीवर चित्रपटात काम करू नये म्हणून दबाव टाकला.

लग्नानंतर रती अग्निहोत्रीला मुलगा तनुज झाला. मात्र, यादरम्यान त्यांचे पतीसोबतचे भांडण वाढतच गेले. भांडणाचा हा प्रवास इथेच थांबला नाही, एके दिवशी रती अग्निहोत्री आणि त्यांचा नवरा यांच्यात वाद इतके बिघडले की, दोघेही एकमेकांशी भांडू लागले. यानंतर 2015 मध्ये रती अग्निहोत्रीने पती अनिल विरवानी यांच्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. याशिवाय त्यांनी पतीविरुद्ध मारहाणीची तक्रारही दाखल केली होती. या सर्व प्रकारानंतर रतीने तिच्या वेदनादायक नातेसंबंधाचा खुलासा केला आणि म्हणाली, “मी माझ्या पतीचा अत्याचार बराच काळ सहन करत राहिली, पण जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या तेव्हा मी आमचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला.” रतीच्या म्हणण्यानुसार, “त्या इतकी वर्षे फक्त त्यांचा मुलगा तनुजसाठी गप्प राहिल्या. कारण, त्यांना कोणत्याही किंमतीत मुलाला भांडणापासून दूर ठेवायचे होते.”

आपल्या पतीच्या वागण्याला कंटाळून रती अग्निहोत्रीने लग्नाच्या 30 वर्षानंतर 2015 मध्ये घटस्फोट घेतला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर रती अग्निहोत्री 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डिटेक्टर’ आणि टीव्ही शो ‘काजल’मध्ये दिसल्या हाेत्या. आणि आता अभिनेत्री आणि त्यांचा मुलगा तनुज विरवानीसोबत आनंदी जीवन जगत आहे. रती अग्निहोत्रीने आपल्या कारकिर्दीत दहा भाषांमधील सुमारे 150 चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Bollywood actress rati agnihotri birthday know about her journey she suffered because of husband for 30 years career life son)

आधिक वाचा-
कडाक्याच्या थंडीत रणवीरनंतर आता ‘या’ अभिनेत्याने केले न्यूड फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाला…
जेव्हा ‘या’ अभिनेत्याच्या लग्नाच्या वरातीत एकत्र पोहचले राज कपूर-दिलीप कुमार, अनसीन फोटो व्हायरल

हे देखील वाचा