Monday, April 15, 2024

‘बबिता जी’ नेपाळमध्ये घेत आहे सुट्टयांचा आनंद, मुनमुन दत्ताने शेअर केले ट्रिपचे जबरदस्त फोटो

मुनमुन दत्ताने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘मध्ये बबिताची भूमिका साकारून खूप लोकप्रियता मिळवली आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यातील सर्व अपडेट्स ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशात सध्या मुनमुनने तिच्या व्यस्त जीवनातून थोडा ब्रेक घेतला असून सध्या ती तिच्या नेपाळ प्रवासाचा आनंद घेत आहे.

मुनमुन दत्ता (munmun dutta) हिने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नेपाळ प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत. नेपाळच्या भेटीदरम्यान, अभिनेत्रीने पशुपती नाथ मंदिर आणि बौद्ध स्तूपालाही भेट दिली. यावेळी अभिनेत्रीने तिच्या कपाळावर त्रिशूल असलेले काही सुंदर फोटो देखील पोस्ट केले आहेत, यासह मुनमुनने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पशुपती नाथ मंदिर आणि बौद्ध स्तूप”, अभिनेत्रीने नेपाळमधील स्मारक स्थानासमोर पोझ देतानाचे देखील अनेक फोटो शेअर केले आहेत.

दुसरीकडे, मुनमुनच्या नेपाळ दौऱ्याची माहिती समजल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. एका चाहत्याने मुनमुनला तिच्या प्लॅनिंगबद्दल विचारत कमेंटमध्ये लिहिले, “मॅडम उद्या कुठे जाणार आहात??”, तर एकाने लिहिले, “वाह मॅम मी पण तेथेच आहे.” अशात एका चाहत्याने “नेपाळी चाहत्यांना भेटा” असे सुचवले.

सर्व सुंदर कमेंट्सवर प्रतिक्रिया देत, मुनमुनने चाहत्यांचे आभार मानण्यासाठी एक इंस्टा पाेस्ट शेअर केली. तिने लिहिले, “नेपाळमध्ये मला ओळखल्या गेले का? होय खूप. काही अमेजिंग आणि उत्साही चाहते भेटले, ज्यांनी मला काही ठिकाणी पाहिले.” तिने पुढे लिहिले, “पण मी बहुतेक वेळा माझा चेहरा झाकून ठेवत हाेते, जेणेकरून मी ठिकाणे आणि मंदिरांना भेट देऊ शकेन, त्यांचा आनंद घेऊ शकेन आणि प्रार्थना करू शकेन. मात्र, पुढच्या वेळी मी चाहत्यांना नक्कीच भेटेन.” असे मुनमुनने आपल्या पाेस्टमध्ये सांगितले.(taarak mehta ka ooltah chashmah babita ji aka munmun dutta is enjoying vacation in nepal share photos)

अधिक वाचा –
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
मानधन घेताना रजनीकांत यांनाही टक्कर देतो थालापती विजय, कुण्या अभिनेत्रीसोबत नाही तर चक्क फॅनसोबत केलंय लग्न

हे देखील वाचा