Sunday, June 23, 2024

रवीना टंडनच्या लेकीने ‘या’ कारणास्तव पॅपराझींना वाटली मिठाई, व्हिडिओ व्हायरल

रवीना टंडनची मुलगी राशा अभिनय जगतापासून दूर असली तरी चांगलीच चर्चेत असते. राशा थडानीने नुकतेच जे काही केले आहे ते पाहून सर्वजण तिची मनापासून प्रशंसा करत आहेत. खरे तर रवीनाची लेक राशाने नुकतेच शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. या सगळ्यात जेव्हा मुंबई विमानतळावर पॅपराझींने तिला पाहिले तेव्हा, त्यांनी तिला मिठाई मागितली, ज्यावर राशाने पुढच्या वेळी भेटल्यावर नक्की मिठाई घेऊन येईल असे सांगितले. अशात राशा थडानीने आपले वचन पाळले आणि मुंबई विमानतळावर पॅपरझींसाठी मिठाई घेऊन गेली.

व्हायरल व्हिडिओमध्ये राशा (rasha) हिने व्हाइट कलरचा क्रॉप टॉप आणि पिंक कलरची पँट घातली आहे. यासाेबत तिने केस माेकळे ठेवून तिचा लूक पुर्ण केला आहे, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. अशात हा व्हिडिओ पॅपराझींने त्यांच्या अकाउंटवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले की, “तिने आपले वचन पाळले.” यासाेबत त्यांनी हार्ट इमाेजीही टाकला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यापूर्वी रवीना टंडनने तिच्या मुलीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते आणि माहिती दिली होती की, तिच्या मुलीने हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने लिहिले, “आणि ती घरट्यातून उडण्यास तयार आहे.”

यापूर्वी एप्रिलमध्ये रवीना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तेव्हा राशाने तिच्या आईसाठी एक नाेट लिहिली होती आणि अभिनेत्रीच्या यशाबद्दल अभिनंदन केले हाेते. रवीना टंडन नुकतीच KGF Chapter 2 या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक व्यवसाय केला. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यशचीही महत्त्वाची भूमिका होती. ( bollywood actress raveena tandon daughter rasha distributes sweets to paparazzi on her graduation video goes viral on social media )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अदिती राव हैदरी ‘या’ अभिनेत्यासाेबत राजस्थानमध्ये घेतेय सुट्टयांचा आनंद, फाेटाे व्हायरल

नव्या नवेली नंदा मुंबई विमानतळावर दिसली रुमर्ड बाॅयफ्रेंडसाेबत; चाहते म्हणाले, ‘नजर ना लगे…’

हे देखील वाचा