Thursday, April 18, 2024

तीन वर्षांनंतर अखेर रिया चक्रवर्तीचे अश्रु अनावर; ढसाढसा रडत म्हणाली, ‘लोकांनी मला अनेक…’

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता हळूहळू इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. अशात रिया तब्बल 3 वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. आजकाल, अभिनेत्री एमटीव्हीच्या प्रसिद्ध शो रोडीज 19मध्ये गॅंग लीडर बनली आहे. अशात या शोदरम्यान अभिनेत्रीने संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले आहे.

रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) एमटीव्ही रोडीज-कर्म या कांडमध्ये सकारात्मकतेबद्दल बोलताना दिसली. आपले जुने दिवस आठवत रिया म्हणाली, “अनेक लोक अनेक गोष्टी सांगतील. माझ्यासाेबत अनेकांची नावे जाेडण्यात आली आणि माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. मी ते लेबल स्वीकारू का? त्याच्यामुळे मी माझे आयुष्य थांबू का? अजिबात नाही, त्यांना जाऊ द्या कोण आहेत ते? मंडळी, रिया या शोचा भाग झाल्यानंतर सुशांत सिंग राजपूतचे चाहते खूप संतापले होते. अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल केले जात होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

सुशांत सिंगच्या तिसर्‍या पुण्यतिथीनिमित्त रियाने अभिनेत्याची आठवण काढत एक पाेस्ट शेअर केली. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अभिनेत्यासोबतचा एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये रिया सुशांतसोबत रोमँटिक अंदाजात  दिसत आहे. यादरम्यान दोघेही एकमेकांसाेबत खूपच कम्फर्टेबल होते. रियाने हा व्हिडिओ शेअर करत रेड हार्ट देखेल टाकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

एमटीव्ही रोडीज-कर्म या कांड 3 जून 2023 पासून दर शनिवार आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता MTV आणि जिओ सिनेमावर प्रसारित हाेत आहे. या सीझनची थीम ‘कर्म या कांड’ आहे. गौतम गुलाटी आणि प्रिन्स नरुला व्यतिरिक्त, रिया चक्रवर्ती देखील या नवीन सीझनमध्ये गँग लीडर आहे. आणि सोनू सूद हा शो होस्ट करत आहे.(bollywood actress rhea chakraborty on receiving a lot of hate she said i have been labeled with many names)

अधिक वाचा-
वडील-मुलीच्या नात्यातील भावनिक बंध उलगडणारा ‘बापमाणूस’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित हाेणार सिनेमागृहात

प्रेग्नेंसीदरम्यान वाढत्या वजनामुळे इलियानाची झाली ‘अशी’ अवस्था; म्हणाली, ‘डॉक्टरांकडे जाऊनही फायदा नाही…’

हे देखील वाचा