बॉलिवूडची अभिनेत्री सान्या मल्होत्राने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु तिने या चित्रपटांमध्ये साकारलेल्या आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. सान्याने सन २०१६ साली आलेल्या नितेश तिवारी दिग्दर्शित आणि सुपरस्टार आमिर खान अभिनित ‘दंगल’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिने यामध्ये साकारलेली बबिताची भूमिका लक्षवेधी ठरली होती. आज ती आघाडीची अभिनेत्री आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आज सान्या आपला २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या या वाढदिवसानिमित्त तिच्या कारकीर्दीवर टाकलेली नजर…
मुंबईत जाऊन दिले ऑडिशन
सान्याचा जन्म २५ फेब्रुवारी, १९९२ रोजी दिल्लीमध्ये झाला होता. सान्याने दिल्लीतील ‘गार्गी कॉलेज’मधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. यानंतर तिने मुंबईच्या दिशेने आपले पाऊल टाकले. तिथे जाऊन तिने ऑडिशन देण्याव्यतिरिक्त अनेक टीव्ही कमर्शियलमध्ये कॅमेरामनलाही असिस्ट केले होते.
अभिनयापूर्वी आजमावले डान्समध्ये नशीब
सान्या प्रसिद्ध अभिनेत्रीव्यतिरिक्त उत्तम डान्सरही आहे. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी सान्याने रियॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’मध्येही आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे तिने आमिर खान अभिनित ‘सिक्रेट सुपरस्टार’चे ‘सेक्सी बलिए’ हे गाणे कोरिओग्राफ केले होते.
‘दंगल’नंतर ‘या’ चित्रपटात झळकली
‘दंगल’ या चित्रपटानंतर सान्या सन २०१८ मध्ये रिलीझ झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातही झळकली होती. या चित्रपटात ती प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुरानासोबत दिसली होती. हा चित्रपट हिट ठरला होता. यानंतर ती सुपरस्टार नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत ‘फोटोग्राफ’ या चित्रपटातही दिसली होती.
सान्याने शेअर केले भन्नाट फोटो
सान्या आपल्या सुट्टींचे फोटोही शेअर करत असते, जे काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल होतात. सान्याने बीचवर उभे राहून अनेक सुंदर आणि बोल्ड पोज दिले आहेत.
नुकतेच तिने आपले बिकिनी फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बोल्ड अंदाजात दिसत आहे. सान्याच्या या फोटोंवरून नजर हटवणे कठीण होईल.
सान्याचे हे फोटो खूपच चांगले दिसत आहेत. यामध्ये ती आपल्या चश्म्याला हाताने पकडताना दिसत आहे. सान्याच्या या लूकबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. सान्याच्या फोटोंवर केवळ चाहतेच नाही, तर बॉलिवूड स्टार्सही कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत.
या चित्रपटांमध्ये केले काम
सान्याने ‘दंगल’, ‘बधाई हो’ आणि ‘फोटोग्राफ’ या चित्रपटांव्यतिरिक्त मागील वर्षी रिलीझ झालेले ‘शकुंतला देवी’ आणि ‘लुडो’ या चित्रपटातही झळकली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भोजपुरी गायक नीलकमल सिंगचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ; इंटरनेटवर करतंय धमाल, पाहा व्हिडिओ
-रेकॉर्ड ब्रेक युट्यूबर अंकित यादवचा नवा विक्रम, ‘त्या’ गाण्याला मिळाल्या तब्बल ६४ कोटी हिट्स










