Tuesday, June 25, 2024

धाेनीची टीम CSK जिंकताच सारा अली खानचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, युजर्सने उडवली अभिनेत्रीची खिल्ली

चेन्नई सुपर किंग्स संघाने गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाची धूळ चारली. यासह एमएस धोनी याने चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. या सामन्यात हार्दिक पांड्या याच्या गुजरात संघाकडे सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी होती, पण त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. अशात सारा अली खान आणि विकी कौशलही अंतिम सामना पाहण्यासाठी आणि त्यांच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके‘ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबादला पोहोचले हाेते. अशात आता सारा अली खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल हाेत आहे, जाे पाहून साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला ‘बेवफा’ म्हणत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

महेंद्रसिंग धोनीची टीम ‘चेन्नई सुपर किंग्स’ने आयपीएल 2023चे विजेतेपद पटकावल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान, आता सारा अली खान (sara ali khan) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पॅपराझींने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, चेन्नई सुपर किंग्ज जिंकल्यामुळे आणि गुजरात टायटन्सचा पराभव झाल्यामुळे सारा अली खान आनंदाने बहरली आणि ती इतकी उत्साहित झाली की, तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले. कधी सारा अली खान विकी कौशलसाेबत टाळ्या वाजवताना दिसली, तर कधी आनंदाच्या भरात डान्स करताना दिसली. अशात तिच्या या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही तासातच सारा अली खानच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यासाेबतच एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘सारा दीदी बेवफा है’, तर दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले की, “तू खूप छान अभिनय करते”. अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, “हे तेच लोक आहेत जे काही काळापूर्वी गुजरात टायटन्ससाठी जल्लोष करत होते, काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे.(bollywood actress sara ali khan celebrates csk win over shubhman gill gujarat titans bewafa video goes viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
B’day Special | जेनिफर विंगेटचे ‘हे’ पाच बोल्ड लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

“व्यक्तीरेखेचा खून केला होता…” किरण माने यांनी त्यांच्या ‘त्या’ वादावर आधारित शेअर केली सूचक पोस्ट

हे देखील वाचा