Tuesday, May 28, 2024

‘यार का सताया हुआ है’, नवाजुद्दीन – शहनाजचा नवीन म्युझिक व्हिडिओ रिलीज; पाहून तुम्ही व्हाल थक्क

बाॅलिवूड अभिनेत्री शहनाज गिलच्या चॅट शोमध्ये जेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी दिसला तेव्हापासून चाहत्यांची मागणी हाेती की, त्यांना नवाझुद्दीन सिद्दीकी आणि शहनाज गिल यांना स्क्रिनवर एकत्र काम करताना पाहायचे आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शहनाज गिल आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे नाव आहे, ‘यार का साताया हुआ है.’ बी-प्राकने या गाण्याला आपला दर्दभरा आवाज दिला आहे.

प्रेम-ब्रेकअपवर बनलेल्या या गाण्याचे बोल इतके अचूक आहेत की, रसिकांच्या डोळ्यात पाणी येते. शहनाज या गाण्यात नवाजुद्दीनला दुसऱ्या काेण्या मुलीसाेबत पाहते आणि त्यानंतर गैरसमजचे चक्र सुरु हाेते. मुलगी याला फसवणूक मानते आणि मुलगा हैराण आणि अस्वस्थ राहत दारूला साेबती बनवताे. शेवटी हा गैरसमज दूर होतो की, कालांतराने वाढत जातो, हे पाहण्याासाठी गाणं नक्की बघा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

गाण्याचे संगीत बी-प्राकचे असून, गाण्याला आवजही त्यानेच दिला आहे. हे गाणे जानी यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे. शहनाज गिल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अरविंद्र खैरा यांनी कॅमेऱ्यात सुंदर चित्रण केले आहे. गाण्याची कोरिओग्राफी रजित देव यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

मंडळी, शहनाजने नवाजुद्दीनकडून तिच्या ‘देसी वाइब्स चॅट शो’मध्ये तिच्यासोबत काम करणार असल्याचे वचन घेतले होते. अशा परिस्थितीत दोघेही या गाण्यात एकत्र दिसले. नवाज आणि शहनाजचे हे गाणे चाहत्यांनाही आवडत आहे.(bollywood actress shehnaaz gill and nawazuddin siddiqui brought new break up song yaar ka sataya hua hai released watch here )

अधिक वाचा-
“…तर मी दोन मुलांची आई असते”, अभिनेत्री केतकी चितळेच मोठ वक्तव्य; एकदा वाचाच
जान्हवी कपूरने गाेल्डन ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फाेटाेशूट, एकदा पाहाच

हे देखील वाचा