Tuesday, May 28, 2024

नवाजुद्दीन अन् शहनाज गिलच्या नवीन गाण्याचे पोस्टर रिलीज, ‘या’ दिवशी येणार चाहत्यांच्या मनोरंजनासाठी

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शहनाज गिल त्यांच्या ‘यार का साताया हुआ है’ या नव्या गाण्यामुळे चर्चेत आहेत. अशात या गाण्याचे पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे बी प्राकच्या जोहराजाबी अल्बममधील आहे. या गाण्यासाठी दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते, अशात रविवारी (25 जुन)ला या गाण्याचे पाेस्टर समोर आले आहे, ज्याला नवाजुद्दीनने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्टर शेअर केले आहे. यासोबत त्याने लिहिले आहे की,

मैं पागल हूँ, और बहुत पागल
पर ये भी बात है के दिल सच्चा है
छीन तो लेता तुझको सरेआम मैं
पर मसला ये है, के शौहर तेरा आदमी अच्छा है ।

पोस्टर पाहता असे लक्षात येते की, ‘यार का साताया हुआ है’ हे एक दु:खी गाणे असणार आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर उदासीनता दिसत आहे. मात्र, दोघेही बीटीएसमध्ये डान्स करताना दिसले.

सध्या पोस्टर पाहून नवाज आणि शहनाजच्या चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. युजर्स कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘व्वा! काय पोस्टर आहे… मी खूप उत्साहित आहे, तर एका युजरने लिहिले की, ‘आम्ही शहनाज गिल आणि नवाजुद्दीन दोघांचाही आदर करतो. मला खात्री आहे की, हे गाणे काहीतरी खास असेल. अशात एका युजरने लिहिले की, ‘आम्ही गाण्याची वाट पाहत आहोत.’

शहनाज आणि नवाजुद्दीनचे हे गाणे 3 जुलैला रिलीज होणार आहे. पंजाबची कॅटरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज या गाण्यात आपल्यापेक्षा अनेक वर्षांनी मोठ्या असलेल्या नवाजसोबत रोमान्स करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. नवाजुद्दीनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच त्याचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अवनीत कौरही दिसली आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ची निर्मिती कंगना राणौतने केली आहे, ज्याला चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.( bollywood actress shehnaaz gill nawazuddin siddiqui new song from b praak zohrajabeen album poster out)

अधिक वाचा:
डिलिव्हरीपूर्वी ‘अशी’ झाली हाेती रामचरणच्या पत्नीची अवस्था, माैत्रिणिने शेअर केला व्हिडिओ
‘या’ कारणास्तव ‘हाऊसफुल्ल 3’नंतर अभिषेक बच्चनने घेतला ब्रेक; म्हणाला, ‘मी साइनिंग अमाउंट…’

हे देखील वाचा