Tuesday, March 5, 2024

इंडस्ट्रीतील भेदभावावर अखेर श्वेता त्रिपाठीने साेडले माैन; म्हणाली, ‘अनेकवेळा कलाकार…’

मिर्झापूर वेब सिरीजद्वारे श्वेता त्रिपाठीने लाखो हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच ती कुणाल खेमूच्या ‘कंजूस मक्खीचूस’ या चित्रपटात काम करताना दिसली. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा खूप पसंत केली जात आहे. दरम्यान, अभिनेत्री इंडस्ट्रीतील जेंडर भेदभावावर खुलेपणाने बाेलली. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्वेता (shweta tripathi) हिने सांगितले की, ‘इंडस्ट्रीत प्रोफेशनली जेंडर म्हणून अनेकदा भेदभाव केला जातो.’ तिने सांगितले की, ‘अनेकदा सहकलाकारांना चांगली वागणूक दिली जात नाही.’ तसेच, तिने हेही स्पष्ट केले की, ‘तिने आतापर्यंत काम केलेल्या सर्व प्राेजेक्टमध्ये असे प्रकरण अनेकदा पाहायला मिळाले आहेत.’ याबद्दल बोलताना अभिनेत्रीने एका घटनेचाही उल्लेख केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tripathi Sharma (@battatawada)

ती म्हणाली, “एका सेटवर असे व्हायचे की, माझे जेवण येऊन जायचे, पण माझ्या मेकअप टीम आर्टिस्टचे जेवण येत नव्हते. ते गरीब लोक उपाशी राहायचे. हे मला नंतर कळले. जे मेल एक्टर हाेते, त्यांच्या टीमचे जेवण नेहमीच येऊन जात हाेते. त्यामुळे काय आहे ते समजत नाही. बेसिक गोष्टी कशा देता येत नाहीत?तरीदेखील, आता मला बऱ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे समजत आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tripathi Sharma (@battatawada)

या संदर्भात ती पुढे म्हणाले की, “प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकजण येथे काम करण्यासाठी आले आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की, आपण सॉल्यूशन शाेधण्याच्या नांदात त्या व्यक्ती किंवा परिस्थितीसमोर नतमस्तक हाेऊ.” श्वेता लवकरच ‘मिर्झापूर3’ मध्येही दिसणार आहे. यात तिच्यासोबत पुन्हा एकदा अली फजल, दिव्येंदू शर्मा आणि रसिका दुग्गल दिसणार आहेत.( bollywood actress shweta tripathi talks about discrimination on the set)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धर्म बदलल्यानंतर राखी सावंतने पहिल्यांदाच रोजा ठेवला; बुरखा परिधान केलेला व्हिडीओ व्हायरल

बाॅलिवूडमध्ये शिल्पा शेट्टीपासून ते आमिर खानपर्यंत ‘या’ स्टार्सनी थेट चाहत्यांसाेबत थाटला संसार

हे देखील वाचा